शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाणीपुरवठ्याने करपली-भेगाळली भातशेती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:00 IST

डहाणू तालुक्यातील स्थिती : पेठ परिसरातील ४०-५० एकर शेती वाया जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क कासा : सूर्या कालव्यातून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कालव्यांना जोडणाऱ्या टोकाच्या बऱ्याच गावातील शेती वाया जाण्याची भीती असून पाण्याअभावी पेठ येथील ४० ते ५० एकर भातशेती ऐन दाणे भरण्याच्या हंगामात करपून जाण्याची भीती येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोना काळात बरेच लहानमोठे शेतकरी सगळे कामधंदे बंद असल्याने आपल्या भातशेतीवर अवलंबून आहेत, मात्र इथेही कालव्यातून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा तसेच कामगारांची कमतरता यामुळे सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे शेतीवर परिणाम होत आहे. डहाणू तालुक्यातील तवा, धामटने, पेठ, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे कासा, चारोटी, सारणी, आंबिवली, उर्से, साये, आंबिस्ते, रणकोळ, रानशेत आदी, तर पालघर तालुक्यातील सोमटा, आंबेदा, नानिवली, रावते, बोरशेती, चिंचारे, आकेगव्हाण, महागाव, कुकडे आदी सुमारे १०० गावांना उजव्या व डाव्या कालव्यांतर्गत शेतीसाठी उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. सिंचन या प्रमुख उद्देशाने या धरणाची निर्मिती केली असली तरी आता बिगरसिंचनासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामधून जलसंपदा विभागास दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो, मात्र तरीही कालवे दुरुस्ती व कालवे देखभाल व शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामगारांची नेमणूक करत नाहीत. त्यामुळे नाहक पाणीही बऱ्याच ठिकाणी वाया जाते. त्यामुळे कालव्यांना टोकाला जोडणाऱ्या बऱ्याच गावांना अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याअभावी भातपिकावर परिणाम होत आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात, मात्र तरीही या बाबीकडे जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत. तालुक्यातील पेठ येथे सुरळीत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतात पाणी वाळून घेण्यासाठी रात्री १२ ते १ वाजेपर्यंत जागरणही करतात.

कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने भातपिके करपू लागली आहेत.- हरेश्वर ठाकूर, शेतकरी, पेठ

कालव्यांतून सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भातशेती वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.- नरोत्तम पाटील, शेतकरी, पेठ