कोरोना संकटात नव्या पशुरोगाचा प्रादुर्भाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:46 AM2020-09-30T02:46:56+5:302020-09-30T02:47:22+5:30

माणसांनाही होते लागण : मांस विक्रेत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन; उपचार नसल्याने खबरदारी घेणे गरजेचे

Outbreak of new animal disease in Corona crisis! | कोरोना संकटात नव्या पशुरोगाचा प्रादुर्भाव!

कोरोना संकटात नव्या पशुरोगाचा प्रादुर्भाव!

Next

पालघर : सीमाभागातील जनावरांना ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर’ या विषाणूजन्य साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा बाधित जनावरांचे मांस खाल्ल्याने माणसांनाही लागण होण्याचा धोका असल्याने पशुपालक व मांस विक्रेत्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

पालघर जिल्ह्यालगतच्या गुजरात राज्यातून बोकडांची मोठी आवक होत असल्याने जिल्हावासीयांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या रोगाची लागण विशिष्ट प्रकारच्या गोचीडमुळे होते. जनावरांचे रक्त शोषणारी गोचीड एका जनावरावरून दुसऱ्या जनावराच्या अंगावर जाते. त्यामुळे जनावरांमध्ये याची झपाट्याने लागण होते. बाधित जनावरांचे मांस खाल्ल्याने या रोगाचा प्रादुर्भाव माणसांमध्ये दिसून येतो.
या रोगाची लागण झाल्यास वेळीच निदान व उपचार न झाल्यास ३० टक्के रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. या रोगावर हमखास व उपयुक्त असे उपचार नसल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर
डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली.

या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोचीड निर्मूलनाचा कार्यक्रम प्राधान्याने घेण्याबाबत व सर्व ती आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून पशुपालकांनी या आजाराबाबत जागरूक राहावे.
- डॉ. माणिक गुरसळ,
जिल्हाधिकारी

रोगाची लक्षणे
1या रोगाने बाधित झालेल्या माणसांमध्ये सुरुवातीला डोके दुखणे, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी होणे.
2डोळे लाल होणे, घशात तसेच तोंडाच्या वरच्या भागात फोड येणे.

Web Title: Outbreak of new animal disease in Corona crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.