वसईत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:49 IST2021-09-23T15:49:14+5:302021-09-23T15:49:32+5:30
लोकअदालतमध्ये वाहतूक नियमभंगाचे दावे निकाली निघणार

वसईत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन
आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क
वसई: वसई न्यायालयात शनिवार दि 25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून या लोकन्यायालयामध्ये वसई विरार क्षेत्रातील वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून वाहतुक पोलीसांनी ऑनलाईन पद्धतीने आकारलेल्या ई-चलनाचे दावे प्रत्यक्ष लोकअदालतीत निकाली काढण्यात येणार आहेत.
दरम्यान ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी वाहतुक पोलीसांनी वाहन चालकांना कोर्टाची म्हणजेच लोकअदालतीची नोटीस मोबाईल वर एसएमएस संदेशद्वारे पाठवली असून अश्या प्रकारची नोटीस मिळालेल्या वाहन चालकांनी जवळची वाहतुक शाखा , पोलीस ठाणे अंमलदार, तालुका विधी सेवा समिती, वसई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा वाहनचालकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ई-चलनाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी असे आवाहन वसई कोर्टाचे वतीनं येथील जिल्हा न्यायाधिश -1 वसईचे सुधीर एम. देशपांडे, आर. एच. नाथाणी, सह दिवाणी न्यायाधीश (ब) स्तर,वसई तसेच एस.बी.पवार, दिवाणी न्यायाधीश (क) स्तर, वसई आणि वाहतुक पोलीस निरीक्षक, वसई शाखा शेखर डोंबे यांनी केले आहे.