बोईसरमध्ये पाकिस्तानी कलाकारांना विरोध

By Admin | Updated: October 7, 2016 05:04 IST2016-10-07T05:04:57+5:302016-10-07T05:04:57+5:30

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उशी येथे जो भ्याड हल्ला करून एकोणीस भारतीय जवान शहिद केले.त्याचा निषेध करून बोईसर येथील चित्रपट गृहात पाकिस्तानी

Opposition to Pakistani artists in Boisar | बोईसरमध्ये पाकिस्तानी कलाकारांना विरोध

बोईसरमध्ये पाकिस्तानी कलाकारांना विरोध

बोईसर : पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उशी येथे जो भ्याड हल्ला करून एकोणीस भारतीय जवान शहिद केले.त्याचा निषेध करून बोईसर येथील चित्रपट गृहात पाकिस्तानी कलाकार असलेले असलेले चित्रपट दाखवण्यात येऊ नये अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आलीअसून जर हे चित्रपट दाखविलेच तर मनसे स्टाईलने प्रत्युत्तर देण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
मनसेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष अनंत दळवी, पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, कामगार सेना सचिव शिवाजी रेंबाळकर, तालुका उपाध्यक्ष चेतन संखे, विभाग अध्यक्ष राजू आखाडे इ. मनसेच्या पदाधिकारी गुरुवारी बोईसर येथील चित्रालय व के.टी. व्हीजन या दोन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनला दिलेल्या इशारा पत्रात पाकिस्तानी कलाकार असलेल्या पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या दिल है मुश्किल व रईस हे दोन चित्रपट दाखविण्यात येऊ नये असे सांगितले.

Web Title: Opposition to Pakistani artists in Boisar