गॅस टँकर उलटून एकाचा मृत्यू, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:54 IST2019-02-07T05:54:39+5:302019-02-07T05:54:48+5:30

डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाणपुलाजवळ गॅसचा टँकर उलटल्याने गुरुवारी मोटारसायकलचालकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत.

 One killed and two injured in gas tanker | गॅस टँकर उलटून एकाचा मृत्यू, दोघे जखमी

गॅस टँकर उलटून एकाचा मृत्यू, दोघे जखमी

कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाणपुलाजवळ गॅसचा टँकर उलटल्याने गुरुवारी मोटारसायकलचालकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत.
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर गॅस टँकरचा टायर फुटल्याने गाडी उलटली. तेव्हा समोरून येणाºया दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील प्रवीण बोलाडा (२७) व रमेश बोलाडा (२३, रा. रानशेत पाटील पाडा) आणि ट्रकचालक हरिश्चंद्र यादव (३५, रा. मुंबई) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना वापी येथे नेत असताना रमेश याचा रस्त्यातच मृत्यू झाला.
हे दुचाकीस्वार येथील एशियन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. तेव्हा हा अपघात घडला. तर कंटेनरमध्ये प्रोपेलिन गॅस होता; लिकेज न झाल्याने अनर्थ टळला.

Web Title:  One killed and two injured in gas tanker

टॅग्स :Accidentअपघात