शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नेरुळ-उरण रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 05:09 IST

पहिला टप्पा आॅक्टोबरमध्ये : दोन दशकांची प्रातिक्षा संपणार; विकासालाही गती

नामदेव मोरे नवी मुंबई : उलवे ते उरण परिसरातील लाखो नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. नेरुळ ते खारकोपर दरम्यान पहिल्या टप्प्यातील रेल्वे सेवा आॅक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूरहोऊन विकासालाही गती मिळणार आहे.

नवी मुंबईमध्ये १९९२ मध्ये रेल्वे वाहतूक सुरू झाली व येथील विकासाला गती मिळाली. ठाणे- वाशी व ठाणे-पनवेल रेल्वे सुरू झाल्यानंतर कोपरखैरणे ते दिघा परिसरातील बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले. वाशी ते पनवेलपर्यंतचा विकास गतीने होत असला तरी उरण परिसरात अपेक्षित गतीने विकास होत नव्हता. रेल्वे सेवा नसल्यामुळेच त्या परिसरामध्ये बांधकाम व्यवसाय धिम्या गतीने सुरू होता. यामुळे १९९७ मध्येच नेरुळ-उरण रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४९५ कोटी रुपये होता; परंतु या मार्गामध्ये अनेक अडथळे येत गेले व प्रकल्पाचा खर्च तब्बल १७८२ कोटी रुपयांवर गेला. जमीन संपादनासह वनविभागाच्या अडथळ्यामुळे निर्धारित वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. सिडकोने विमानतळाचे काम सुरू केल्यानंतर रेल्वे प्रकल्पाच्या कामांनाही गती दिली. नेरुळ-उरण रेल्वेचे दोन टप्पे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटरचा समावेश करण्यात आला. या मार्गावरील कामे जवळपास पूर्ण होत आली होती; परंतु प्रत्यक्षात कधी रेल्वे सुरू होणार याविषयी ठोस तारीख सांगितली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घेतलेल्या मीटिंगमध्ये रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पहिला टप्पा आॅक्टोबरमध्ये सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

आॅक्टोबरमध्ये रेल्वे सुरू झाल्यास विकासाला मोठी गती मिळणार आहे. सिडकोने उलवे नोड विकसित केला; परंतु वाहतुकीची सोय नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती. जुईनगर, नेरुळ व सीबीडी रेल्वे स्टेशनपासून खासगी टॅक्सी व रिक्षांचा वापर करून उलवे येथे जावे लागत होते. उरण महामार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असल्यामुळे व बसेसची संख्या मर्यादित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. रेल्वे सेवा लवकर सुरू व्हावी, अशी मागणी केली जात होती. अखेर आॅक्टोबरचा मुहूर्त सापडला आहे.पहिल्या टप्प्यातील रेल्वे स्थानकाची उभारणी सिडको करणार आहे. सागरसंगम वगळता इतर रेल्वे स्थानकाची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक कामे केली जात आहेत.तरघर होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानकउरण मार्गावर तरघर रेल्वेस्थानक विमानतळापासून जवळ असणार आहे. यामुळे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक करण्याचा सिडकोचा मानस आहे. रेल्वे सुरू करण्यासाठीचे काम पूर्ण केले जाणार असून उर्वरित विकासकामे टप्प्या टप्प्याने केली जाणार आहेत.उलवेवासीयांना दिलासासिडकोने उलवे नोड विकसित केला असून त्या परिसरामध्ये हजारो नागरिक वास्तव्यासाठी गेले आहेत. रेल्वे नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना बस, रिक्षा व टॅक्सी, जीपचा आधार घ्यावा लागत आहे. वाहतुकीची सोय नसल्यामुळे अनेकांनी घरे खरेदी करूनही तेथे वास्तव्यास जाणे टाळले आहे. या सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.वैशिष्ट्ये : रोडवर चार महत्त्वाचे पूल, ७८ छोटे पूल, १५ भुयारी मार्ग, प्रवाशांसाठी सर्व सुविधा असलेली रेल्वेस्थानकउरण मार्गावरील रेल्वेस्थानक : सीवूड, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजनपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी आणि उरणपहिला टप्पारेल्वे मार्गाची लांबी : १२ किलोमीटरमार्गाचे स्वरूप : सीवूड ते खारकोपर व बेलापूर ते सागरसंगमसीवूड : पहिल्या टप्प्याची सुरुवात सीवूड रेल्वेस्थानकापासून होणार आहे. येथील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन २०१६ मध्येच त्याचा वापर सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण केले जाईल.तारघर : सिडकोने रेल्वेस्थानकाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, स्थानक इमारतीच्या एकात्मिक विकासाची कामे प्रगतिपथावर असून १८६ मीटर लांबीचे संपूर्ण आरसीसी छताचे काम पूर्ण झाले आहे.बामणडोंगरी : सिडकोने प्लॅटफॉर्म व आवश्यक कामे पूर्ण करून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतर केले आहे. फर्निचर व इतर कामे प्रगतिपथावर आहेत.खारकोपर स्थानक : स्थानकाची अत्यावश्यक कामे पूर्ण करून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतर करण्यात आली आहेत. बेंचेस, अत्यावश्यक फर्निचरची कामे सुरू आहेत.दुसरा टप्पारेल्वे मार्गाची लांबी :१५ किलोमीटरमार्गाचे ठिकाण : खारकोपर, गव्हाण, रांजनपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी-उरण1मध्य रेल्वेने दुसºया टप्प्यामधील चार स्थानकांचे काम सुरू केले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत दुसºया टप्प्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.2दुसºया टप्प्यातील प्रमुख आगारकाम, पूल, भुयारी मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे.3दुसºया टप्प्यामध्ये १३.९३ हेक्टर जमीन संपादित केली असून, उर्वरित जमीन संपादनाचे काम सुरू आहे.4या मार्गावर चार हेक्टर जमीन वनविभागाची असून त्यासाठीची मंजुरी आली आहे.बांधकाम उद्योगालाही गतीउलवे परिसरामध्ये शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू आहे. दोन महिन्यांत रेल्वे सुरू होणार असल्यामुळे या परिसरातील बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. घरांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. या परिसरामधील गुंतवणूक वाढणार आहे.

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरारrailwayरेल्वे