शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

Vidhan Sabha 2019: पालघरमधील राष्ट्रवादीचा उमेदवार सेनेच्या कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 4:57 AM

घोडा हे शिवसेनेचे मावळते आमदार आहेत.

पालघर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शब्दाखातर रिंगणात उतरलेले श्रीनिवास वनगा यांचा मार्ग निर्धोक व्हावा म्हणून तेथील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार अमित घोडा यांना दुपारी शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात आणि नंतर मुंबईत वरिष्ठ नेत्यांकडे नेल्याची जोरदार चर्चा आहे.घोडा हे शिवसेनेचे मावळते आमदार आहेत. संधी नाकारल्यामुळे त्यांनी अर्ज भरताना शेवटच्या क्षणी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते रिंगणात उतरल्यानंतरही कॉँग्रेस पक्षाने माजी आमदार शंकर नम यांचा मुलगा योगेश याला तेथून रिंगणात उतरविले होते. कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसमधील वाटाघाटींनुसार भिवंडी ग्रामीण आणि पालघर या मतदारसंघातील उमेदवार परस्परांसाठी माघार घेणार होते. त्यात पालघरमध्ये नम माघार घेतील, असे ठरले होते. मात्र दिवसभर घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींत घोडा यांना ‘तुमचा अर्ज बाद होईल’, असे सांगून दुपारी शिवसेनेच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येते. तेथून नंतर त्यांना आधी ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना मुंबईत नेण्यात आले. त्यामुळे उद्या घोडा माघार घेतील असे शिवसेनेचे स्थानिक नेते खासगीत सांगत आहेत. त्यामुळे वाटाघाटीत कॉँग्रेसकडून हा मतदारसंघ पदरात पाडून घेणाऱ्या राष्टÑवादी कॉँग्रेसची पंचाईत झाली आहे. अखेर घोडा माघार घेतील आणि नम रिंगणात राहतील, अशी चर्चा सुरू आहे.या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात दोन्ही कॉँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप यांच्यासह विविध पक्षांची महाआघाडी रिंगणात आहे. तिला निवडणूक रंगात येण्यापूर्वीच शिवसेनेने धक्का दिला आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019palghar-acपालघर