शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांच्या हट्टापाई जनतेला भुर्दंड

By admin | Updated: April 15, 2017 03:11 IST

जव्हार तलसीलदार कचेरीमार्फत मिळणारे विविध दाखले सध्या नायब तहसीलदार यांच्या वेळखाऊ कार्यपद्धतीमुळे मिळेनासे झाल्याने सर्वसामान्यांवर वारंवार खेपा

- हुसेन मेमन , जव्हार

जव्हार तलसीलदार कचेरीमार्फत मिळणारे विविध दाखले सध्या नायब तहसीलदार यांच्या वेळखाऊ कार्यपद्धतीमुळे मिळेनासे झाल्याने सर्वसामान्यांवर वारंवार खेपा मारण्याची वेळ आली आहे. येथील नव्वद टक्के जनता आदिवासी असल्याने त्यांना शिक्षण, घरकूल, शबरी घरकूल तसेच रेशन कार्डासाठी विविध दाखल्यांची गरज भासते. मात्र, एकाच अधिकाऱ्याची स्वाक्षरी या कामी अधिकृत ठरत असल्याने सगळ्यांचा खोळंबा झाला आहे.कार्यालयातील चार नायब तहसीलदारांना पूर्वी स्वाक्षरीचे अधिकार होते. मात्र १ एप्रिल २०१७ पासून सागर भागवत यांनी नायब तहसीलदार म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर कार्यपद्धतीचे केंद्रीकरण केल्याने त्यांच्या शिवाय कुणालाही दाखल्यावर स्वाक्षरीचा अधिकार उरला नाही. या एक कलमी कार्यक्रमामुळे लाभ तर नाहीच मात्र, गोरगरिब आदिवासींना पदरमोड करुन खेपा मात्र घालाव्या लागत आहेत. रेंगाळलेल्या कामा विरोधात आतापर्यंत शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आदिवासी तालुका असल्यामुळे जास्ती जास्त दाखले व इतर कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, अ‍ॅफिडेविटची कामे करण्यासाठी थेट खेडोपाड्यातून आदिवासी बांधव येत असतात. या कार्यालयात निवडणूक, महसूल, संजयगांधी व निवासी नायब तहसीलदार असे चार पदे आहेत. पूर्वी या दाखल्यांवर तिघा अधिकाऱ्यांना स्वाक्षरीचे अधिकार होते, मात्र एप्रिल महिन्यांपासून फक्त निवासी नायब तहसीलदार भागवत यांनाच अधिकार मिळाल्यामुळे शेकडो दाखल्यांची प्रकरणे कार्यालयात पडून आहेत.मनमौजी कार्यापद्धती आणि कामांचा वाढता बोजानायब तहसीलदार भागवत हे रजेवर गेल्यावर किंवा मिटींगला गेल्यावर येथील कामे ठप्प होतात. तसेच ते कार्यालयात आले की, आपली जागा सोडून तहसीलदार यांच्या कचेरीत जावून तासंतास बसतात. त्यामुळे प्रकरणांच्या संख्येत दिवसगणीक वाढ होत असून कामे रेंगाळत आहेत. परिणामी वावर-वांगणी, चालतवड, रूईघर-बोपदरी अशा ४० ते ४५ कि.मी. दुर तालुक्याच्या टोकावर असलेल्या आदिवासी बांधवांना नाहक आर्थिक भुर्दड सासावा लागत आहे.‘‘महिनाभर आम्ही ट्रेनिंगला होतो व मध्ये सुट्ट्यापन होत्या म्हणून दाखले पेन्डींग आहेत. आज सर्व होऊन जातील. इतर नायब तहसीलदारांना चार्ज दिला होता पण ते स्विकारायला तयार नव्हते. - सागर भागवत, निवासी नायब तहसीलदार, जव्हार