Narendra Mehta BJP Rally: भाजप तोडायला एक मिनिट लागणार नाही; नरेंद्र मेहतांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:29 PM2021-12-06T18:29:30+5:302021-12-06T18:31:22+5:30

Narendra Mehta BJP Rally Speech:भाजपा प्रदेश नेतृत्वाने ऍड रवी व्यास यांच्या मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला विरोध करणाऱ्या मेहतांनी रविवारी रात्री त्यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात भाजपा कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली.

Narendra Mehta's warning to BJP in BJP Workers Rally mira Bhayandar Chandrakant Patil | Narendra Mehta BJP Rally: भाजप तोडायला एक मिनिट लागणार नाही; नरेंद्र मेहतांचा थेट इशारा

Narendra Mehta BJP Rally: भाजप तोडायला एक मिनिट लागणार नाही; नरेंद्र मेहतांचा थेट इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - चंद्रकांत दादांना मीरा भाईंदरमध्ये काय ताकद आहे ते माहिती आहे. जिल्हाध्यक्ष नियुक्ती करताना दादांना चुकीचा पोरगा आणि चुकीचा बायोडाटा दाखवून लग्न झाले आहे. भाजपा रुपी मुलीला आम्ही मोठे केले असून ती चांगल्या हातात राहावी यासाठीच आरसा दाखवण्याचे काम करतोय. पक्ष तोडायला एक मिनिट लागणार नाही अशा शब्दात भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टोलेबाजी केली. पक्षातंर्गत विरोधकांसह दोन्ही आमदार, मनसे आदींचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला . 

भाजपा प्रदेश नेतृत्वाने ऍड रवी व्यास यांच्या मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्ष पदी केलेल्या नियुक्तीला विरोध करणाऱ्या मेहतांनी रविवारी रात्री त्यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात भाजपा कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली . महापौरांसह सर्व पालिका पदाधिकारी , बहुतांश नगरसेवक उपस्थित होते . 

जिल्हाध्यक्ष व्यास यांच्यावर, ते दोन वेळा घटस्फोट घेतलेले ( दोन पक्ष बदललेला ) जावई असून परत तसाच निर्णय घेतला तर काय करणार ?. मेळाव्याशी भाजपाचा संबंध नाही सांगता मग आंदोलन केले तेव्हा का तसे सांगितले नाही . कारण तेव्हा व्होटबँक वाढवण्याचे, जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम करत होतो . २०२२च्या पालिका निवडणुकीत पुन्हा जास्त संख्येने नगरसेवक निवडून आणायचे आहेत. 

माझ्या कडे पे रोल वर असणारे एक आजी व एक माजी नगरसेवक हे सुद्धा मला आता पक्ष आणि संघटन काय असते ते त्याचे उपदेश देत आहेत.  तुमच्या घरी येऊन पद , तिकीट द्यायची गोष्ट करतील पण भुलू नका . ते स्वताच्या स्वार्था साठी पक्ष तोडण्याचे काम करत आहेत. पक्ष सर्वात मोठा आहे हे नाकारत नाही पण कार्यकर्त्यां शिवाय पक्ष चालू शकत नाही . पक्ष तोडण्याचे पाप मनात नाही . 

त्याग , तपस्या , बलिदान करून जीवावर खेळून पक्षाला इथं पर्यंत आणले आहे .  भाजपाचे नाव घ्यायची हिम्मत नव्हती तेव्हा मी  पक्षात आलो. २००९ ला ९ नगरसेवक होते आता ६१ नगरसेवक आहेत . देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर विश्वास आहे . पदा मुळे कोणाला तिकीट मिळाले आहे का ? तिकीट हे काम करणारे, लोकांच्य समस्या सोडवणारे त्यांना मिळते .  फडणवीस माझ्या वा कोणाच्या सांगण्या वरून नाही तर सर्वे रिपोर्ट आणि मेरिट वर तिकीट देणार . निलेश सोनी , संजय थरथरे, माझा भाऊ विनोद ना आज पर्यंत तिकीट मिळाले नाही . 

आजकाल आपले पण टोचून बोलू लागले आहेत . आमदार प्रताप सरनाईक यांनी मला माल खानेवाला मदारी म्हटले .  मी डमरू वाजवताच तुम्ही नाचू लागता . पण रामाच्या वानर सेने समोर तुमची शिवसेना चालणार नाही . मुझफ्फर हुसेन यांनी केलेल्या टीकेवर देखील त्यांनी त्यांचा बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना असे सांगत खिल्ली उडवली . टेम्बा रुग्णालय इमारत आम्ही बांधली पण बांधकाम करणारे ठेकेदार मनसेचे होते . आज शहरातील शासना कडची विकासकामे ठप्प पडली आहेत . पालिकेची कामे सुरु आहेत असे मेहता म्हणाले . 

जैन याना नाक घासून भाजपात आणणार 

आमदार गीता जैन यांच्यावर बोचरी टीका मेहतांनी केली . जैन यांना नाक घासायला लावत पुन्हा भाजपात आणेन आणि त्यांना दाखवून देईन अपमान कसा असतो ते . एकदा पक्षात या आणि तिकीट घेऊन निवडणूक तुम्हीच लढवा. मग आम्ही दाखवतो बेईमानी काय असते ते . जैन याना शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागा ठेवली नाही  असे मेहता म्हणाले . 

होय , मी विंचू आणि डंख मारतो 

ऍड. व्यास आयोजित भाजपा मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी डंख मारणाऱ्या विंचूची गोष्ट सांगितली होती .  मेहतांनी देखील माझी रास वृश्चिक असून त्याचे चिन्ह विंचू आहे . माझ्यावर विष चालत नाही . मी डंख मारतो पण आपल्या लोकांना नाही तर काँग्रेस , शिवसेना, मनसे आदींना मारतो . जर डंख खायचा नसेल तर आपणा सोबत या असे करून संघटना वाढवली आहे . 

Web Title: Narendra Mehta's warning to BJP in BJP Workers Rally mira Bhayandar Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.