शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 19:53 IST

नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशनचे  “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान  मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे.

-अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी -  नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशनचे  “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान  मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानावरील स्टेन्सिल्ड चिपवर नावे पाठविण्याची संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद शिक्षक पावबाके यांनी रविवार, 7 जुलै रोजी पहिल्या इयत्तेतील 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी केली.नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( JPL ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( 75 नॅनोमिटर ) रुंदीत नागरिकांकडून नोंदविण्यात आलेली नावं स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील . "या ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना, सर्वजण या नव्या मोहिमेत सामील व्हावेत, सर्वाना याची माहिती व्हावी असे आम्हाला वाटते असे "नासाच्या वॉशिंग्टन येथील सायन्स मिशनचे डारेक्टरेट" (SMD) थॉमस झुरबुचेनचे म्हणणे आहे.या मोहिमेअन्तर्गत गोवणे शाळेतील विद्यार्थ्यांचीही  नावं या ग्रहावर जाण्याकरीता त्याची ऑनलाईन नोंदणी केली असून त्या सर्वांचे ऑनलाइन बोर्डिंग पास ही उपलब्ध झाल्याचे पावबाके यांनी सांगितले. विशेषतः मराठी भाषा आणि मराठी शाळा यांची अस्मिता जपत मराठीमधे त्यांची नोंदणी केली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे किंवा शाळेचे नाव 30 सप्टेंबर 2019 च्या रात्री 11.59 पर्यंत मंगळावर पाठवण्याकरीता  mars.nasa.gov या संकेतस्थळावर नोंदणी करु शकता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासह, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तसेेेच अवकाश संशोधन शास्त्राचा प्रचार प्रसार करण्याची सुवर्ण संधी असल्याचे पावबाके म्हणाले. रोव्हर 2020 हे यान "ऍटलस V 541" या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. ते 2021च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.या उपक्रमांतर्गत आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा आणि आपला बोर्डिंग पासही https://go.nasa.gov/Mars2020Passमिळवता येतात.

टॅग्स :scienceविज्ञानSchoolशाळाMarsमंगळ ग्रह