नालासोपारा: खुनाच्या गुन्ह्यात १ वर्षापासून फरार असलेल्या २ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 20:30 IST2025-01-11T20:28:50+5:302025-01-11T20:30:47+5:30
आतापर्यंत ७ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून ५ आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत गुन्ह्याचा तपास करत आहे.

नालासोपारा: खुनाच्या गुन्ह्यात १ वर्षापासून फरार असलेल्या २ आरोपींना अटक
-मंगेश कराळे, नालासोपारा
हत्येच्या गुन्ह्यात १ वर्षांपासून फरार सलेल्या २ आरोपींना पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनीविरारमधून अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी योगिता बाविस्कर यांनी दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कांदिवलीच्या मारुती चाळीत राहणारा सुधीर सिंग (२७) आणि वालईपाडा रोडवरील उपाध्याय चाळीत राहणारा वैभव मिश्रा (२८) हे दोघे १२ जानेवारीला गौराईपाडा परिसरात रूम बघण्यासाठी गेले होते.
अपहरण करून कोयत्याने केली होती हत्या
आरोपींनी त्याचे अपहरण करून गौराईपाडा परिसरातील यादवेश विद्यालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत आरोपींनी अंगावर कोयता, दुसरे धारदार हत्याराने वार करून लाकडी बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले होते.
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून ५ आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत गुन्ह्याचा तपास करत आहे.
भाटपाडा परिसरात लावला होता सापळा
या गुन्ह्यातील फरार आरोपी विरारच्या भाटपाडा परिसरात येणार असल्याचे पोलीस अंमलदार किरण आव्हाडला माहिती मिळाली होती. या माहितीचा आधारे पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून आरोपी रोहन सिंग (२८) आणि अखिलेश यादव (२४) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) डी एन चौधरी, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि रमेश वाघचौरे, पोउपनिरी तुकाराम भोपळे, पोहवा योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड यांनी पार पाडली आहे.