दारूच्या नशेत मित्राची हत्या, फरार झालेला आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 16:28 IST2017-11-20T16:28:31+5:302017-11-20T16:28:45+5:30
दारुच्या नशेत मित्राची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला वालीव पोलिसांनी तीन दिवसात गजाआड केले. 18 नोव्हेंबरला वसई पूर्वेकडील गिदाराई पाड्यातील निर्जनस्थळी गवतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.

दारूच्या नशेत मित्राची हत्या, फरार झालेला आरोपी अटकेत
वसई : दारुच्या नशेत मित्राची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला वालीव पोलिसांनी तीन दिवसात गजाआड केले. 18 नोव्हेंबरला वसई पूर्वेकडील गिदाराई पाड्यातील निर्जनस्थळी गवतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. वालीव पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी आपल्या पथकासह कोणताही पुरावा नसताना मृत इसमाची ओळख पटवून आरोपीला अवघ्या तीन दिवसात गजाआड केले.
हनुमान पटेल (35) असे मयत इसमाचे नाव असून त्याची हत्या त्याचा मित्र सुनील लुगुन याने केल्याची कबुली दिली आहे.
हनुमान आणि सुनील येथील मिनाली चाळीतील एका खोलीत राहत. 18 नोव्हेंबरला दारू पिऊन सुनील पहाटे एक वाजता घरी आला होता. यावेळी हनुमानने दरवाजा उघडायला उशीर केला. त्यामुळे सुनील संतापला होता. संतापाच्या भरात सुनीलने हनुमानला लाकडी दंड्यूक्याने बेदम मारहाण केली. संतापलेल्या सुनीलने हनुमानाला घराबाहेर कडून दांडक्याने डोक्यावर आणि छातीवर प्रहार केले. त्यात हनुमानचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी हनुमानचा मृतदेह निर्जन ठिकाणी गवतात टाकून सुनील फरार झाला होता.