चारचाकी कारमधून आई व चिमुकली पडली? आई गंभीर जखमी तर चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 20:42 IST2022-12-10T20:42:29+5:302022-12-10T20:42:55+5:30

विरार फाटा येथील धक्कादायक घटना

Mother and child fell from a four wheeler car The mother was seriously injured and the child died | चारचाकी कारमधून आई व चिमुकली पडली? आई गंभीर जखमी तर चिमुकलीचा मृत्यू

चारचाकी कारमधून आई व चिमुकली पडली? आई गंभीर जखमी तर चिमुकलीचा मृत्यू

मंगेश कराळे

नालासोपारा : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी कारमधून घरी जात असताना आई व चिमुकली पडल्या. यानंतर आई गंभीर जखमी झाली व चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पण या दोघांना नेमके ढकलले की पडले हे अद्याप स्पष्ट झाले नसून मांडवी पोलीस तपास करत आहे. 

वाडा येथे राहणाऱ्या सोनाक्षी वाकडे (२०) ही १० महिन्याच्या लावण्या या चिमुकलीसह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोरमार्गे इको कारने शनिवारी सकाळी जात होते. विरार फाटा येथील नोव्हेल्टी हॉटेलच्या समोर दोघीही कारमधून पडल्या. त्याचवेळी पाठीमागून जाणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाने त्यांना पाहिले व दोघांनाही नालासोपारा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले. रुग्णालयात १० महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत. 

नेमके ते दोघे पडले की ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू झाला असून गंभीर आईवर उपचार सुरू आहे. त्यांचे नेहमी स्टेटमेंट बदलत असल्याने नेमकी घटना काय घडली ते स्पष्ट होत नाही आहे. याबाबत तपास करत आहे.  प्रफुल वाघ
(पोलीस निरीक्षक, मांडवी पोलीस ठाणे)

Web Title: Mother and child fell from a four wheeler car The mother was seriously injured and the child died