मीरा भाईंदर बीएसयूपी योजना घोटाळ्याचा तपास काशीमीरा पोलिसांकडून काढून गुन्हे शाखे कडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:01 AM2023-07-16T00:01:33+5:302023-07-16T00:03:41+5:30

यातील एक आरोपी भाजपा काशीमीरा मंडळचा अध्यक्ष असल्याने तसेच गुन्ह्यातील राजकीय लोकांचे हितसंबंध पाहता हा गुन्हा पहिल्या तपास अधिकाऱ्या कडून काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे . 

Meera Bhayander BSUP Scheme Scam Investigation Transferred From Kashmir Police To Crime Branch | मीरा भाईंदर बीएसयूपी योजना घोटाळ्याचा तपास काशीमीरा पोलिसांकडून काढून गुन्हे शाखे कडे 

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या बीएसयूपी योजनेत झालेल्या घोटाळ्याचा तपास काशीमीरा पोलिसां कडून काढून तो आता गुन्हे शाखा युनिट १ कडे सोपवण्यात आला आहे . तर यातील एक आरोपी भाजपा काशीमीरा मंडळचा अध्यक्ष असल्याने तसेच गुन्ह्यातील राजकीय लोकांचे हितसंबंध पाहता हा गुन्हा पहिल्या तपास अधिकाऱ्या कडून काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे . 

काशीमीराच्या जनता नगर आणि काशीचर्च झोपडपट्टीत इमारती उभारून फ्लॅट देण्याच्या बीएसयुपी योजनेत बनावट शिधावाटप पत्रिका, बनावट वीज बिल, करारनामे, बनावट सदनिका वितरणपत्र आदी मार्फत ७ जणांची फसवणूक केल्याचा गुन्हा २२ जून रोजी काशीमीरा पोलिसांनी दाखल केला आहे . 

त्या गुन्ह्यात पोलिसांनी मंगल गांधी (४१)  ;  दयाशंकर यादव (३४)  ; चंद्रप्रकाश चौहान (५४ ) ;  नरसिंग भुरे (३६) ; हरीहरसिंह चौहान (५३) ; अमृतलाल पाल (५०) ह्या ६ आरोपीना आता पर्यंत अटक करण्यात आली होती .  शिधावाटप पत्रिकाधारकांच्या तब्बल ४६२ बोगस नोंदी आढळून आल्या आहेत . 

यातील आरोपी चंद्रप्रकाश चोहान हा भाजपाचा काशीमीरा मंडळ अध्यक्ष आहे . शिवाय भाजपच्या तत्कालीन नगरसेविका मीरादेवी यादव कुटुंबीयांनी ५ सदनिका - दुकाने लाटल्याची तक्रार झाली आहे . त्यातूनच गुन्ह्याचा सुरवाती पासून तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांच्या कडे असलेला तपास काढून  तो पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड यांच्याकडे दिला होता . 

मात्र काशीमीरा पोलिसां कडून तपास काढून तो आता गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या कडे देण्यात आला आहे . तर तपास आर्थिक गुन्हे शाखे कडे देण्याची शक्यता वर्तवली जात होती पण आता तो गुन्हे शाखा १ कडे दिलाय . गुन्हे शाखा कडून तपासाला गती येईल अशी अपेक्षा एकीकडे वर्तवली जात आहे तर राजकीय लोकांचा सहभाग पाहता राजकीय दाबाखाली यात गुंतलेल्याना पाठीशी घातले जाईल अशी शंका सुद्धा व्यक्त होत आहे .  

निरीक्षक कुराडे यांनी सांगितले कि, आपल्या कडे या गुन्ह्या बाबतची कागदपत्रे आलेली असून त्याचे अवलोकन सुरु आहे . तर महापालिका शहर अभियंता दीपक खांबित यांच्या बनावट सह्या करून सदनिका दिल्याची वितरणपत्र सापडली आहेत . त्याप्रकरणी खांबित यांनी पोलिसांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असताना पोलिसांनी अजून त्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही . 
 

Web Title: Meera Bhayander BSUP Scheme Scam Investigation Transferred From Kashmir Police To Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.