पालघरमध्ये भीषण अपघात, कार झाडावर आदळून पाच जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 08:44 IST2018-02-07T07:40:30+5:302018-02-07T08:44:49+5:30
माहीम रस्त्यावरील पाटीलवाडी रोडवर पानेरी नाल्याजवळ कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

पालघरमध्ये भीषण अपघात, कार झाडावर आदळून पाच जणांचा जागीच मृत्यू
पालघर - पालघर जिल्ह्यातील माहीम रस्त्यावरील पाटीलवाडी रोडवर पानेरी नाल्याजवळ कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. कार भरधाव वेगात असताना पाटीलवाडी येथे एका वळणावर झाडावर आदळली.
अपघातातील पाच मृतांपैकी एक वडराई येथील रहिवासी आहे तर अन्य चारजण तारापूर परिसरात राहतात. कारमधून हे सर्व प्रवासी माहिमहून पालघरच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अपघात इतका भीषण होता कि, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
माहीम येथील मृतांची नावे
1)किरण परशुराम पागधरे (वय 30 वर्षे) -वडराई
2)निकेश मोहन तामोरे(वय 29)- तारापूर
3)संतोष बळीराम खानपाडा-पालघर
4)दिपेश पागधरे - सातपाटी
5)विराज अर्जुन वेताळ -पालघर.