शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

काेराेनामुळे तुंगारेश्वरचा महाशिवरात्री उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:29 AM

मंदिर राहणार बंद : देवस्थानचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई-विरार शहरात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होताना दिसत आहे. पालिका प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. या वर्षी १० आणि ११ मार्चला वसई पूर्वेतील तुंगारेश्वर येथे होणारा महाशिवरात्री उत्सव सोहळा रद्द करण्याचा निर्णय देवस्थानकडून घेण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्याने भाविकांनी या उत्सवासाठी  येऊ नये, असे आवाहन तुंगारेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी केले आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त वसई-विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातून महादेव मंदिरात एक ते दीड लाख भाविक येत असतात. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून देवस्थान विश्वस्त मंडळाकडून उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडून मार्गदर्शन मागितले. या बैठकीत उत्सव विश्वस्त लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे. 

दाेन दिवस मंदिरात भाविकांना प्रवेश नाहीकोरोनाचे सावट अजून पूर्ण संपलेले नसून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. अद्याप लसीकरण पूर्ण झालेले नाही. यातच १० आणि ११ मार्चला महाशिवरात्री उत्सव होणार आहे. या सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी होऊ नये, यासाठी म्हणून  दोन दिवस भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराTempleमंदिरMahashivratriमहाशिवरात्री