शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

Vidhan Sabha 2019 : मतदारसंघाला काय हवं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 1:12 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - सक्षम आरोग्य यंत्रणा हवी. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य.

आमदाराचे नाव : विष्णू सवरामतदारसंघ : विक्रमगडपक्ष : भाजपसक्षम आरोग्य यंत्रणा हवी. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य. पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपायोजना हवी. उच्च शिक्षणाची सुविधा हवी. एमआयडीसी हवी.>त्यांना काय वाटतं?आदिवासी विकासमंत्री सारखे महत्त्वाचे खाते आपल्या वाट्याला आले. या माध्यमातून मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यात मोठा निधी आपण देऊ शकलो. या माध्यमातून मतदारसंघातील वर्षानुवर्षे रखडलेले रस्ते दुपदरी करून अनेक महत्त्वाचे पूल, आदिवासी आश्रमशाळेच्या इमारती, आदिवासी संस्कृती जपण्यासाठी वारली आर्ट या सांस्कृतिक केंद्राची निर्मिती, ट्रॉमा केअर सेंटर , जव्हार येथील कुटीर रूग्णालयाचा विकास केला.- विष्णू सवरा, आमदार>विक्रमगड मतदारसंघया मतदारसंघातील धरणांवर कोट्यवधींचा खर्च झाला. परंतु या पाण्याचा उपयोग स्थानिकांना झाला नाही. राजकीय नेतृत्वाच्या अपयशामुळे झाले नाही. पेसा कायद्याची अमलबजावणी केल्यामुळे आदिवासी विकास खात्याच्या अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना हस्तांतरित झाला. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश देत शिक्षणाचा खर्च आदिवासी विभागाने उचलला. कुपोषण रोखण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजना अमलात आणली.>top 5 वचनंन्यायालयाचा प्रश्न सोडवूबसआगाराची निर्मितीउपविभागीय कार्यालयाची निर्मितीपाणीपुरवठा योजना करणारउपकेंद्रांची निर्मितींआमदार विष्णू सवरा यांना मंत्रिपद मिळाल्याने मतदारसंघातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मंत्रिपदाच्या माध्यमातून सवरा यांनी काही प्रमाणात विकास कामावर मोठा निधी खर्च केला. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पूल यावर खर्च केल्याने त्यांनी कंत्राटदार यांना पोसल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. मंत्रिपदाच्या माध्यमातून या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न संपण्याऐवजी दिवसागणिक तीव्र होऊ लागल्याने हे सवरांचे अपयश मानले जात आहे. आजही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.>विधिमंडळातील कामगिरीआदिवासी विकासमंत्री म्हणून सक्षमपणे काम केले. अनेकदा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे सभागृहामध्ये कौतुक केले. पालघर जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद सवरा यांच्या रूपाने पहिल्यांदा मिळाले. या मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यशस्वी ठरले. सलग साडेचार वर्ष मंत्रिपद लाभून त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. विधीमंडळात कायम उपस्थित राहिले आहेत.>पाच वर्षांत काय केलं?मतदारसंघात राज्य, केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी करण्यावर भर दिला. पंतप्रधान आवास योजना, यासाठी असलेल्या विविध अनुदानाच्या योजना तसेच या भागातील आरोग्याच्या समस्येचे गांभीर्य ओळखून जिल्हा पातळीवर डॉक्टर निवड प्रक्रि या राबविली. सामान्य माणसाला सुलभतेने सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न, कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी उपाय योजना राबविण्यावर भर.>दोन तरूणांनी केली आत्महत्यानालासोपारा : पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील परिसरातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा परिसरातील आंबेडकर नगरमधील निवास नंबर ३६ मध्ये राहणारा मिथुन गौतम तांबे (३५) या तरुणाने सोमवारी क्षुल्लकावरून ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तर दुसºया घटनेत पश्चिमेकडील पांचाळ नगरमधील कृष्णा दर्शन बिल्डिंगच्या सदनिका नंबर २०१ मध्ये राहणारा धर्मेंद्र भवरलाल गायरी (२१) या तरुणाने सोमवारी सत्यम कॉम्प्लेक्समधील सदनिका नंबर १०४ मधील गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नालासोपारा पोलिसांनी नोंद केली आहे.>बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून यासारखे प्रश्न आजही कायम आहेत. लोकांच्या हाताला काम नसल्याने येथील आदिवासी समाज दारिद्र्यात खितपत पडला आहे. येथील आदिवासी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याने त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.- ज्ञानेश्वर सांबरे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस>हे घडलंय...मतदारसंघातील रस्ते व पुलांची निर्मितीआरोग्य उपकेंद्रविकासकामांसाठी चारशे कोटी खर्चजव्हार व साखर येथे वीज उपकेंद्र>हे बिघडलंय...पाणीटंचाईचे संकट कायमरोजगार निर्मिती करण्यात अपयशआरोग्ययंत्रणा कोलमडलीसिंचन व्यवस्था कोलमडली

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vishnu savaraविष्णू सावरा