शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: 'दहशतीचा ‘पोपट’ केवळ निवडणुकांच्या हंगामात बोलतो!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 03:30 IST

क्षितिज ठाकूर यांची नाव न घेता प्रदीप शर्मा यांना टोला

वसई : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की वसईतील दहशतीचा मुद्दा उफाळून येतो; इतरवेळी सारेकाही आलबेल असते. दहशतीचा हा ‘पोपट’ केवळ निवडणुकांच्या हंगामात बोलतो, असा टोला आमदार क्षितिज ठाकूर यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नाव न घेता लगावला.बहुजन विकास आघाडीतर्फे विरार येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ठाकूर यांनी ‘साहेब’ कुठे राहतात, असा सवाल केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी अंधेरी, मुंबई असे म्हटल्यावर आ. ठाकूर यांनी त्या ठिकाणी किती लेडीज बार आहेत, असा प्रतिप्रश्न केला. आमची दहशत आहे असे म्हणता ना, तर होय आमची दहशत आहेच. म्हणूनच आम्ही येथे लेडीज बार सुरू करू दिले नाहीत, येथे आजही एकटी महिला रिक्षाने मध्यरात्रीनंतरही एकट्याने घरी सुरक्षितपणे जाऊ शकते, असेही ठाकूर यांनी ठणकावले.‘आम्ही भेदभाव केला नाही’धर्म, वंश, जात, लिंग, भाषा आणि प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता बविआने सर्वांना एका परिवारात आणले. येथील जनतेचा बविआवर विश्वास असून जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण करून पिटाळले जात होते, गुजरात्यांवर हल्ले होत होते तेव्हा हे एन्काउंटर स्पेशालिस्ट कुठे होते? आजही बविआकडे असलेली कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, ताकद, विकासकामे आणि जनतेचा बविआवर असलेला प्रचंड विश्वास यामुळे सैरभैर झालेली मंडळी नसलेल्या दहशतीचा कळीचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचेही आमदार ठाकूर यांनी म्हटले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना