शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

खलाशांचे जीवन रक्षक : ज्येष्ठ मच्छीमाराचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:34 AM

समुद्रात अडचणीत सापडलेल्या

भारतीय तटरक्षक दलातर्फे १७ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित मेरीटाईम सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू बोर्डाच्या सभेत ‘जीवन रक्षक पुरस्कारा’ने डहाणू तालुक्यातील ७१ वर्षीय ज्येष्ठ मच्छिमार नेते अशोक अंभिरे यांना गौरविण्यात आले. त्यांना या व्यवसायाचा ४५ वर्षांचा अनुभव असून गुंगवाडा मच्छिमार सहकारी सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न: आपणास हा पुरस्कार कोणत्या कार्याबद्दल देण्यात आला?गतवर्षी धाकटी डहाणू येथील भानुदास तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट खोल समुद्रात बुडत असताना त्यातील ११ खलाशांचे प्राण वाचविण्यात यश आले. एवढ्यावरच न थांबता बुडत्या बोटीला किनाऱ्यापर्यंत घेऊन येण्याचे दिव्य अन्य मच्छिमार बोटींच्या मदतीने केले. खोल समुद्रात प्रसंगावधान राखून ११ जणांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुखरूप किनाºयापर्यंत घेऊन आल्याच्या कार्याची दखल घेऊन भारतीय तटरक्षक दलातर्फेहा पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला.

प्रश्न : बुडत्या बोटीवरील खलाशांना वाचवण्याच्या प्रसंगाचे वर्णन सांगू शकता?१८ आॅगस्ट रोजी दुपारी आमची पवनसाई आणि भाग्यलक्ष्मी या दोन बोटी मासेमारीकरिता गेल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास खोल समुद्रात भाग्यलक्ष्मी ही बोट दुर्घटनाग्रस्त होऊन बुडत असल्याचा वायरलेश प्राप्त झाला आणि संपर्क तुटला. मात्र तत्पूर्वी मी आणि माझा मुलगा आनंद आम्ही अपघातग्रस्त बोटीच्या मालकाला आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याच्या सूचना आणि धीर देत मदतीसाठी निघत असल्याचे सांगितले. क्षणाचाही विलंब न करता प्रवास सुरू केला. मात्र थोड्या वेळातच मालवाहू जहाज समोर आल्याने त्याला वळसा घालून जावे लागल्याने साधारणत: नऊच्या सुमारास घटनास्थळी पोहचलो. तत्काळ आमच्या बोटीवरील एकूण आठ जणांनी अकरा खलाशांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अकरापैकी चौघांना पोहता येत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना आमच्या बोटीवर घेण्यात यश आले.प्रश्न : त्यानंतर किनाºयापर्यंतचा प्रवास कसा होता?मासेमारी हंगामाच्या पहिल्या टप्यातील ही पहिलीच फिशिंग असल्याने दुर्घटनाग्रस्त बोट तेथेच सोडून येणे आम्हाला पटले नाही. यापूर्वी चार वेळा खोल समुद्रात अपघातग्रस्त बोटींना वाचवून त्यांना किनाºयावर आणण्याचा अनुभव गाठीशी होता. मात्र पावसाळा आणि जोराचा वाºयामुळे अजस्त्र लाटा उसळत असल्याने हा बाका प्रसंग होता. आमच्या बोटीला अपघातग्रस बोट बांधताना दिव्यच करावे लागले. या बचाव कार्यात सुमारे ५० हजारांचे दोरखंड तुटले. रात्रीच्या अंधारामुळे सूर्य उगवण्याची वाटबघत अनेक तास घालवले. त्या काळात नियोजन आणि अन्य मच्छिमार बोटींची मदत घेतली. साधारणत: ताशी ८ ते १० नॉटिकल वेगाने मासेमारी बोट प्रवास करते. येथे केवळ अर्धा नॉटिकल पुढे सरकता येत होते. अखेर २० आॅगस्टला किनारा गाठण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आमच्या स्वागताकरिता संपूर्ण कोळी बांधव आले होते.चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादपावसाळा आणि जोराचा वाºयामुळे अजस्त्र लाटा उसळत असल्याने बाका प्रसंग होता. आमच्या बोटीला अपघातग्रस बोट बांधताना दिव्यच करावे लागले. 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराfishermanमच्छीमार