दिवसाढवळ्या ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्याने वसईत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:07 IST2025-12-09T18:06:45+5:302025-12-09T18:07:48+5:30
पोटावर चाकूने केला वार, वालीव पोलिसांत गुन्हा दाखल

दिवसाढवळ्या ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्याने वसईत खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईत दिवसाढवळ्या ज्वेलर्स मालकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरलेली आहे. आरोपीने पोटावर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस घटनास्थळी भेट दिली आहे. नेमका हा हल्ला चोरीच्या इराद्याने झाला की कोणत्या कारणामुळे याचा पोलिस तपास करत आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. जखमी मालकाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
अधिक माहितीनुसार, वसई पूर्वेस वालीव येथे काळु सिंग यांच्या मालकीचे अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. भर दुपारी गर्दीच्या ठिकाणी हल्लेखोराने दुकान मालकावर चाकूने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी जखमी मालकास रिक्षा मधून इस्पितळात उपचारार्थ दाखल केले.
पोलिसांनी या परिसरामधली नाकाबंदी केलेली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यात येईल. तसेच आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळे पोलिस पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी दिली.