शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

खोटं हे खरं असल्याचं बिंबवणे म्हणजे अभिनय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:26 AM

आभास निर्माण करणे आणि खोटं खोटं इतकं प्रामाणिकपणे करणे की खरं वाटलं पाहिजे. यालाच तर अभिनय म्हणतात.

पालघर : नट एका दिवसात किंवा एका शिबीरात तयार होत नसतो. तो कामं करत करत तयार होत असतो. आणि परिपूर्ण अभिनेता असा कुणीच नसतो. प्रत्येक प्रयोगा अंती तोही शिकतो. असे मत जेष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते विक्र म गोखले यांनी विरार येथे व्यक्त केलेअभिनय म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. या बाबत आपले बरेच अपसमज, गैरसमज असतात. आभास निर्माण करणे आणि खोटं खोटं इतकं प्रामाणिकपणे करणे की खरं वाटलं पाहिजे. यालाच तर अभिनय म्हणतात. आपण भूमिका करतो आहोत याचं भान प्रत्येक क्षणाला नटाला राखता आलं पाहिजे.असे आज ते अमेय क्लासिक क्लब व अमेय कला अकादमी यांनी आयोजित केलेल्या नाट्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे उदघाटक म्हणून बोलत होते.अमेय क्लबने हाती घेतलेला हा उपक्र म नव्या पिढीला लाभदायक ठरावा आणि तो कायम स्वरूपी चालू रहावा अशा अपेक्षाही त्यांनी ह्यावेळी बोलून दाखिवल्या. प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या छोट्या मोठ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.याच शिबिरात आपण परत एकदा एक दिवसासाठी येणार असल्याची सुखद घोषणाही त्यांनी केली. या शिबीरात प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. अमेय क्लबच्या संचालिका ग्रिष्मा पाटील यांनी प्रास्ताविक केलेल्या या उदघाटन सोहळ्यात क्लबचे अध्यक्ष व प्रथम महापौर राजीव पाटील यांनी कला विभागात आपण वर्षभर चालेल असा कार्यक्र म आखणार असल्याचे सांगितले.अभिनय शिकवणे हे कठीण काम असते पण ती कला अवगत करणे शक्य आहे. विक्र मजीं सारखे शिक्षक आपल्या भागातील गुणवंतांना लाभले आहेत याचा फायदा घ्यावा आणिआपले व्यक्तिमत्व व जीवनमान अधिक प्रभावी करावे असे आवाहनही त्यांनी केले. शिबिराचे समन्वयक हेमंत चिटणवीस यांनी शिबीराचे स्वरु प स्पष्ट करताना सर्व प्रशिक्षकांचा परिचय करून दिला. नाट्य लेखिका भारती देशमुख यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन तर राजीव पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. जिल्हा योग प्रशिक्षण संघटनेचे अध्यक्ष संजीव पाटील, डॉ. प्रवीण क्षीरसागर, संतोष पिंगुळकर,ई. मान्यवरही या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. अभिनेते विक्र म गोखले यांचा अमेय क्लब व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार