शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

पैसे नाहीत म्हणून मला नाकारले तिकीट-विश्वनाथ पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 05:17 IST

राजकारणामध्ये अनेकदा ज्याच्याजवळ पैसा नाही अशा उमेदवाराला व्यापक पक्ष हितासाठी उमेदवारी दिली जाते.

वाडा : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रचंड आर्थिक बळ लागते आणि त्याबाबत विश्वनाथ पाटील हे पुरेसे सक्षम नाहीत म्हणून त्यांना भिवंडी मतदार संघातून लोकसभेचे उमेदवारी दिली जाऊ नये अशी शिफारस केल्याने माझा पत्ता कट झाला परंतु २०१४ मध्ये मला पक्षात बोलवून उमेदवारी दिली तेव्हा माझी गरीबी काँग्रेसला दिसली नाही काय?, माहित नव्हती काय? असा सवाल विश्वनाथ पाटील यांनी लोकमतकडे मनोगत व्यक्त करतांना केला.

राजकारणामध्ये अनेकदा ज्याच्याजवळ पैसा नाही अशा उमेदवाराला व्यापक पक्ष हितासाठी उमेदवारी दिली जाते. त्याचा खर्च पक्ष करतो अशी परंपरा आहे. हे पाहून तरी पैसा या कारणासाठी मला उमेदवारी नाकारायला नको होती २०१४ ची माझी आर्थिक स्थिती आणि आजची आर्थिक स्थिती यात कोणताही फारसा फरक पडलेला नाही. माझी संपत्ती फारशी वाढलेलीही नाही अथवा तिच्यात घटही झालेली नाही. असे असतांना आर्थिक दृष्टया गरीब म्हणून मला उमेदवारी कशी नाकारली गेली असा सवालही त्यांनी केला.

उमेदवारी देतांना केवळ आर्थिक सबलता हाच निकष लावला जात नाही उमेदवाराला असलेला जनाधार देखील पाहिला जातो. नंतर उमेदवारीबाबत निर्णय घेतला जातो. ते योग्यच आहे अन्यथा पक्षाच्या उमेदवाऱ्या धन्ना सेठच्याच पदरात जातील तसे होऊ नये यासाठीच निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांनाही काँग्रेसपक्ष उमेदवारी देत आलेला आहे याचा काँग्रेसला कसा विसर पडला असाही सवाल त्यांनी केला. आता मी खूप पुढे निघून गेलो आहे. मंगळवारच्या शहापूर येथील मेळाव्यात नेमलेली समिती उद्या म्हणजे शुक्रवारी तिचा निर्णय देणार आहे त्यानुसार मी माझा राजकीय निर्णय घेणार आहे असेही त्यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.दरम्यान, पाटील यांनी बहुजन समाज पक्ष व अन्य एका पक्षाशी उमेदवारी मिळावी म्हणून संपर्क साधला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. मात्र त्याला पाटील यांच्याकडून दुजोरा मिळू शकलानाही.निर्णय घेणाºया समितीत या मान्यवरांचा होता समावेशशहापूर येथे दि. १/४/२०१९ रोजी शेतकरी, कष्टकरी, भूमिपुत्र, अल्पसंख्यानक समाजाच्या झालेल्या निर्धार मेळाव्यात भिवंडी लोकसभा मतदार संघाबाबत धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. त्यात पुढील मान्यवरांचा समावेश होता. गुरु नाथजी टावरे, लल्लन भाई, भिवंडी, हरिभाऊ खाडे, शहापूर, गोविंद सवर, वाडा, भालचंद्र ठाकरे, ठाणे, शरद आंबो पाटील, भिवंडी, प्रफुल पाटील, पराग पष्टे, वाडा, काशिनाथजी तिवरे, शहापूर, शरद पाटील, वाडा (मशाल), अ‍ॅड. वैशाली घरत, मुरबाड, डॉ. विवेक पाटील, ठाणे, भगवान सांबरे, पडघा, परशुराम सावंत सर, वाडा, तानाजी मोरे, भिवंडी (देवा ग्रुप), दिनेश निमसे, शहापूर, योगेश निपुरते, युवराज ठाकरे, वाडा, निलेश गायकवाड, वाडा, अ‍ॅड. फनाडे, मुरबाड, अविनाश पाटील, पालघर, भगवान कोर, कल्याण, रवी चंदे, शहापूर, नरेंद्र पाटील, भिवंडी, जगन पाटील, भिवंडी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक