शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

कठोर कारवाईने समाजकंटक हादरले, रेतीमाफियांनाही चाप, २ कोटी २५ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 2:39 AM

पालघर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई

पालघर - जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई करीत ५४ लाख ९३ हजार ७०० रुपये तर जुगारावर १७ प्रकरणात २४६ आरोपी वर कारवाई करीत १ कोटी ७० लाख ७३ हजार ७१ अशी एकूण २ कोटी २५ लाख ६६ हजार ७७१ रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाई मुळे अवैध धंद्यावाल्या सोबत त्यांना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी, वाडा या तालुक्यात गुटखा, दारू, गांजा आदी अवैध धंदे वाढत असून वसई तालुक्यात खून, अपहरण, खंडणी, चोºया आदी बेकायदेशीर प्रकरणात मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यात ढासळत चाललेल कायदा व सुव्यवस्थेची घडी रोखण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांनी उचलले होते. त्यासाठी त्यांनी प्रथम बेकायदेशीर कृत्यांना पाठिंबा देणाºया काही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना खड्यासारखे वेचून काढीत त्यांच्या बदल्या जिल्हा कंट्रोल रूम आदी ठिकाणी केल्या होत्या.मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा बेकायदेशीर कृत्यासाठी आजपर्यंत ओळखला जात असून इंधन चोरी, बेकायदेशीर शस्त्रांची विक्री, अपहरण, दरोडे यांचे प्लॅन याच मार्गावर उभारण्यात आलेल्या काही हॉटेल, ढाबे वर रचले जात होते. सातीवली जवळील एका पडक्या घरात लपवून ठेवण्यात आलेले आरडीएक्स, वाडा, पालघर, तलासरी येथे सापडलेले मादक द्रव्याचे मोठे साठे शोधून काढण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आल्याने अधीक्षक सिंग यांच्या पुढे कार्यक्षम पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची फळी उभी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तलासरी चेक पोस्ट वरून दमण, सिल्वासा येथून येणारी चोरटी दारू महामार्गएवजी अन्य गाव पाड्यातील रस्त्या मधून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर पाठविले जात आहेत.पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील रेती बंदरातून काही महसूल कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने सुरू असलेली रेती चोरी रोखीत सुमारे ६ कोटी ९५ लाख ९८ हजार २०० रुपयांची रक्कम शासन दरबारी जमा करीत बेकायदेशीर रेती व्यवसायाचे कंबरडेच त्यांनी मोडण्यात बºयापैकी यश मिळविले आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात गावठी दारूचे अड्डे अनेक वर्षांपासून कार्यरत असून दारू, गांजा आदी सारख्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन बनत असून बिअर शॉपीच्या आड परिमटरु म वजा व्यवस्था उभी करून तरुणांना व्यसनेच्या आहारी घातले जात आहे. त्यामुळे व्यसनाधीनता वाढत असल्याने हे रोखण्यासाठी अधीक्षक सिंग यांनी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.गुन्हेगारांवर कडक कारवाईदारू बंदी,दाखल गुन्हे १०५, उघड गुन्हे १०३, एकूण आरोपी अटक ११४,जप्त माल रक्कम ५४ लाख ९३ हजार ७०० रु पयेजुगार दाखल गुन्हे १७ उघड गुन्हे १७, एकूणआरोपी २४६ जप्त माल १ कोटी ७० लाख ७३ हजार७१ रु पयेवाहन चोरी, घरफोडी, ४५ गुन्हे १ कोटी ७९ लाख ६८ हजार ८९४ रु पयेरेती ६ कोटी ९५ लाख ९८ हजार २०० रु पये

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार