शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

बाप रे बाप हरणटोळ साप, घराच्या खोलीतच दिला 23 पिल्लांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 4:24 PM

तालुक्याच्या आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मादी हरणटोळ या बिनविषारी जातीच्या सर्पाने तेवीस पिल्लांना जन्म दिला. निसर्गातील हा चमत्कार स्वतःच्या घरात घडताना पाहून कडू कुटुंबीय अवाक झाले होते.

डहाणू/बोर्डी - तालुक्यातील आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मादी हरणटोळ या बिनविषारी जातीच्या सर्पाने तेवीस पिल्लांना जन्म दिला. निसर्गातील हा चमत्कार स्वतःच्या घरात घडताना पाहून कडू कुटुंबीय अवाक झाले होते. शुक्रवार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संतोष कडू यांना हरणटोळीचा वावर लक्षात आला. 

संतोष यांना घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सर्वत्र हरणटोळी जातीच्या सर्वाची छोटी पिल्लं आढळली. हे पाहून ते सावध झाले, त्यांनी लक्षपूर्वक निरीक्षण केल्यावर मादा थोड्याथोड्या अंतराने पिलांना जन्म देत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. हा प्रकार घरमालकाने वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेला कळविला. त्यानंतर सर्पमित्र रेमंड डिसोझा घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी मादी पिल्लांना जन्म देत असल्याचे पाहिले. मादा सर्पाची ही क्रिया पूर्ण झाल्यावर नवजात तेवीस पिल्लांना एका भांड्यात गोळा करुन सुमारे साडेतीनफूट लांब मादीला पकडण्यात आले.

दरम्यान, प्राणीमित्र आणि वन कर्मचाऱ्यांनी चरिकोटबी येथील जंगलात या मादा आणि तिच्या पिलांना सोडून दिले आहे. एखाद्या रहिवासी घरात सापाला इतकी पिल्लं देताना पाहणे हा पहिलाच आणि अविस्मरणीय अनुभव असल्याची माहिती प्राणीमित्र रेमंड डिसोझा यांनी दिली. यापूर्वी नागरिक घराच्या आवारात सर्प दिसल्यावर, त्याला ठार मारायचे. मात्र, प्राणीमित्र संघटनेकडून मागील दशक भरापासून सुरू असलेल्या जनजागृतीचे, हे फलित असून त्यामुळेच कडू कुटुंबीयांच्या सहकार्याने हे सर्प सुरक्षित राहू शकले, असे रेमंड यांनी लोकमतशी बोलताना म्हटले. 

टॅग्स :snakeसापHomeघरforestजंगल