मिरारोड - मीरारोडच्या शांतीपार्क भागातील मीरा भाईंदर महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातून गॅस गळती होत असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
अग्निशमन दलाकडून प्रकल्पातून निघणाऱ्या गॅसवर पाण्याचा मारा -परिसरातील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. एसटीपी प्रकल्पातून निघणाऱ्या गॅसवर अग्निशमन दल पाण्याचा मारा करत आहेत. एसटीपी प्रकल्पाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले असून गॅस गळतीची माहिती घेत आहेत. गॅस गळती मुळे परिसरातील नागरिक मास्क घालून वावरत आहेत.
काहींना श्वास घेण्यास त्रास तर काहींना उलट्या झाल्याची माहिती -दरम्यान, वायूच्या असह्य वासाने काहीना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोघा तिघांना उलट्या झाल्या, अशी माहिती स्थानिक नगरसेविका हेमा बेलानी यांनी दिली आहे.
Web Summary : A gas leak at the Mira Road sewage treatment plant caused panic. Firefighters are spraying water to control the leak. Some residents experienced breathing difficulties and vomiting. Investigation underway by engineers.
Web Summary : मीरा रोड के एसटीपी प्लांट में गैस रिसाव से दहशत फैल गई। दमकलकर्मी रिसाव को नियंत्रित करने के लिए पानी का छिड़काव कर रहे हैं। कुछ निवासियों को सांस लेने में तकलीफ और उल्टी हुई। इंजीनियर जांच कर रहे हैं।