गंभीर गुन्हे करणाऱ्या पाच जणांच्या, त्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:10 IST2025-03-04T17:09:43+5:302025-03-04T17:10:07+5:30

Nalasopara Crime News: संघटीतपणे गंभीर गुन्हे करणा-या सराईत पाच जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत माणिकपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ganbhaira-gaunahae-karanaarayaa-paaca-janaancayaa-tayaa-taolaivara-maokakaa-antaragata-kaaravaai | गंभीर गुन्हे करणाऱ्या पाच जणांच्या, त्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई 

गंभीर गुन्हे करणाऱ्या पाच जणांच्या, त्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई 

- मंगेश कराळे
नालासोपारा - संघटीतपणे गंभीर गुन्हे करणा-या सराईत पाच जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत माणिकपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

१० जानेवारीला वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दित अग्रवाल येथील 'कौल हेरिटेज सिटी' येथील रतनलाल सिंघवी (६९) यांच्या मालकीच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. आरोपी हेल्मेट व मास्क घालून दुकानात शिरून बंदुकीचा धाक दाखवून सिंघवी यांना जबर मारहाण केली होती. ते रक्ताच्या थारोळ्यात जखमी पडल्याची खात्री केल्यानंतर आरोपीनी ७१ लाख रुपये किंमतीचे ९४९ ग्रॅम सोने लुटून येथून पोबारा केला होता. तब्बल १५ दिवस ६ टीमच्या ७ पोलीस अधिकारी आणि ५५ पोलीस अंमलदारांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करत हजारो सीसीटीव्ही तपासून वसईतल्या मयंक ज्वेलर्स दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले होते. पोलिसांनी ५ आरोपींच्या सराईत टोळीला अटक करून त्यांच्याकडून २९७ ग्रॅम सोन्याची लगड, १ पिस्टल, १ जिवंत काडतुस, दुचाकी, कोयता, कटावणी, कटर, मोबाईल व इतर सामान असे एकूण २३ लाख ३९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

पोलिसांनी संपूर्ण गुन्ह्याचा मास्टरमाईंड वसईतील रहिवासी व कुविख्यात आरोपी रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा वय (४६) याला गिरीज टोकपाडा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. रॉयवर यापूर्वी हत्या, चोरी, दरोडे, बेकायदा हत्यार बाळगणे अश्या बारा गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून विविध ठिकाणाहून अनुप चौगुले (३६), लालसिंग उर्फ सिताराम मोरे (५६), सौरभ उर्फ पप्पू राक्षे (२७) आणि कर्नाटक येथून चार आरोपींकडून सोने खरेदी करणारा सोनार अमर निमगिरे (२१) या चार आरोपीना अटक केली होती. अनुपवर २० गुन्हे तर लालसिंगवर ३ गुन्हे दाखल आहेत. नमूद आरोपींच्या विरुद्ध दोन दिवसांपूर्वी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे परवानगीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) अशी कलम वाढ करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रीगी यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: ganbhaira-gaunahae-karanaarayaa-paaca-janaancayaa-tayaa-taolaivara-maokakaa-antaragata-kaaravaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.