फरार नायजेरियन आरोपीला लाखांच्या अंमली पदार्थांसह अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:32 IST2025-12-18T18:31:48+5:302025-12-18T18:32:36+5:30
नालासोपारा:- ५ कोटी ६० लाख रुपयांच्या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फरार नायजेरियन आरोपीला पुन्हा ५६ लाखांच्या अंमली पदार्थांसह गुन्हे शाखेच्या ...

फरार नायजेरियन आरोपीला लाखांच्या अंमली पदार्थांसह अटक
नालासोपारा:- ५ कोटी ६० लाख रुपयांच्या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फरार नायजेरियन आरोपीला पुन्हा ५६ लाखांच्या अंमली पदार्थांसह गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी गुरुवारी दिली आहे.
तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ कोटी ६० लाख ४० हजार १५० रुपये किंमतीचा मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. त्यावेळी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात उवाके हेनीं युचेन्ना उर्फ हेर्नी उवाचेकुये हा फरार होता. याचा गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सर्वोतोपरी शोध घेत होते. गुन्हे शाखेचे सफौज मुकेश पवार यांना हा आरोपी कळंब राजोडी परीसरामध्ये लपुन बसला असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली होती.
या मिळालेल्या माहितीवरुन गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेवून त्याला विरार पश्चिम येथील कळंब ते राजोडी रोडवरुन बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकुन ताब्यात घेण्यात आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून २८० ग्रॅम वजनाचा अम्फेटमिन नावाचा अंमली पदार्थ व मोबाईल असा एकुण ५६ लाख १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट) ८ (क), २१, २१(क), २२, २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहा. पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोउपनिरी संतोष घाडगे आणि अजित गिते, सहाफौज संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, राहूल कर्पे, दिलदार शेख, दादा आडके, अनिल साबळे, अक्षय बांगर, मसुब रामेश्वर केकान तसेच सायबर शाखेचे सफौज संतोष चव्हाण यांनी केली आहे.