लहान मुलांना समुद्रात घेऊन जाणारी मत्स्यगंधा बोट पलटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 14:00 IST2021-12-19T13:59:20+5:302021-12-19T14:00:29+5:30
बोट पलटल्याची समजताच किनाऱ्यावर मासे सुकविण्यासाठी उभ्या असलेल्या महिलांनी लांबून हे दृश्य पाहिले.

लहान मुलांना समुद्रात घेऊन जाणारी मत्स्यगंधा बोट पलटली
पालघर : स्वाध्याय परिवाराची मत्स्यगंधा ही बोट स्थानिक मच्छीमारांसह लहान मुलाना घेऊन समुद्रात एक फेरी मारण्यासाठी जात असताना अचानक उलटली. यावेळी बोटीत 10 ते 12 मच्छिमार होते. अचानक बोट पलटल्याने या बोटमधील मच्छिमारांच्या जीवाला धोका होता. मात्र, सुदैवाने या मच्छिमांरांना वाचविण्यात यश आले आहे.
बोट पलटल्याची समजताच किनाऱ्यावर मासे सुकविण्यासाठी उभ्या असलेल्या महिलांनी लांबून हे दृश्य पाहिले. त्यानंतर, अनेक मच्छीमारांनी किनाऱ्यावर असलेल्या होड्यांच्या सहाय्याने खाडीत उतरुन सर्व मच्छिमारांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. त्यामुळे, मच्छिमारांसह किनाऱ्यावरील महिलांचा जीव भांड्यात पडला.