Fire: वसई स्टेशन जवळील दुकाने जळून खाक, फरसाण व मोबाईलच्या दुकानाला लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 15:57 IST2022-08-08T15:56:36+5:302022-08-08T15:57:35+5:30
Vasai News: वसई पश्चिमेच्या स्टेशनजवळ असलेल्या फरसाण व मोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. सुदैवाने या लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही दुकानातील सर्वच सामान जळून खाक झाले आहे.

Fire: वसई स्टेशन जवळील दुकाने जळून खाक, फरसाण व मोबाईलच्या दुकानाला लागली भीषण आग
- मंगेश कराळे
नालासोपारा - वसई पश्चिमेच्या स्टेशनजवळ असलेल्या फरसाण व मोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. सुदैवाने या लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही दुकानातील सर्वच सामान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धुरच धूरच पसरला असल्याने ही आग विझविण्यात अडचणी येत होत्या. अखेर दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनी तीन पाण्याच्या बंबांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही मात्र या आगीत दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.