तीन तासांत आगीवर नियंत्रण; दोन लाख लीटर पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:44 AM2020-02-06T00:44:38+5:302020-02-06T00:44:59+5:30

अडीच हजार ली. फोमचा वापर; ५० जवानांचा समावेश

Fire control in three hours; Consumption of two lakh liters of water | तीन तासांत आगीवर नियंत्रण; दोन लाख लीटर पाण्याचा वापर

तीन तासांत आगीवर नियंत्रण; दोन लाख लीटर पाण्याचा वापर

Next

- पंकज राऊत

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात मंगळवारी संध्याकाळी लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी विविध अग्निशमन दलाचे आठ बंब, ५० जवान आणि काही अधिकाऱ्यांनी तीन तास अत्यंत धोका पत्करुन झुंज दिली. ही आग विझवण्यासाठी जवळपास दोन लाख ली. पाणी तर अडीच हजार ली. फोमचा वापर करावा लागला.

औद्योगिक क्षेत्रातील हरशूल केमिकल्स प्रा.लि. (मे. श्री. साई एंटरप्राइजेस ) प्लॉट नं. टी १०१ या रासायनिक कारखान्याला आग लागल्याची वर्दी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या तारापूर येथील अग्निशामन दलाला मंगळवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर काहीच मिनिटांनी तारापूर अग्निशमन दलाची दोन वाहने प्रथम घटनास्थळी पोहोचली. तेव्हा कारखान्याच्या संपूर्ण परिसरात आग पसरली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. तर ज्वलनशील रसायनांची भरलेली पिंपे फुटून आग अधिकच भडकत होती.

बघता बघता आग शेजारच्या केशवा आॅरगॅनिक कंपनीच्या काही भागापर्यंत पोहोचून मोठा धोका निर्माण झाला. अशावेळी सुरक्षेसाठी पाणी मारून, कुलिंग करून आग थोपवून धरल्याने तो कारखाना आगीपासून वाचवण्यात आला. असे असले तरी त्या कारखान्याची एअर हॅन्डलिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक केबल पूर्णपणे जळून गेल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीसाठी काही दिवस कारखाना बंद राहणार असून यात जवळपास एक कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे मालक डी. के. राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आग विझविण्यासाठी एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे ३, बी.ए.आर.सी., पालघर नगर परिषद, डहाणू अदाणी थर्मल पॉवर, डहाणू नगर परिषद, वसई - विरार महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक अशा एकूण ८ गाड्या घटनास्थळी होत्या. त्यांना आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाºयांएवढीच त्यांचीही भूमिका महत्त्वाची होती.

कारखान्यातील प्लास्टिक ड्रमचा वितळून लगदा केमिकल ट्रान्सफर करताना अर्थिंग दिली असताना स्पार्क होऊन आग लागल्याचे कंपनीच्या मालकांकडून अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले. या कारखान्यातील कच्च्या आणि पक्क्या मालासह
कारखाना जळून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारखान्याच्या मार्जिन स्पेसमधेच रसायनांनी भरलेली पिंपे असल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यावर मात करून तारापूरअग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी मनीष सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी जीव धोक्यात घालून भीषण आग तीन तासात नियंत्रणात आणली. आगीत हा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे.

Web Title: Fire control in three hours; Consumption of two lakh liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.