तारापूर येथील केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 23:30 IST2023-07-03T23:30:21+5:302023-07-03T23:30:39+5:30
तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब आगीशी झुंज देत असून आगीमध्ये कुणी कामगार अडकला आहे का? यासंदर्भात बोईसर पोलिस माहिती घेत आहेत.

तारापूर येथील केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग
पंकज राऊत -
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील डब्ल्यू झोनमध्ये एका केमिकल गोडाऊनला रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची तीव्रता एवढी होती की, आग पालघर व मुरबे या 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील गावातूनही दिसत होती. तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब आगीशी झुंज देत असून आगीमध्ये कुणी कामगार अडकला आहे का? यासंदर्भात बोईसर पोलिस माहिती घेत आहेत.
आगीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या ज्वलनशील रसायनांचा साठा जळत असल्याने आगीची तीव्रता वाढत असून आग परिसरातील कारखान्यात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.