मिसेस इंडिया स्पर्धेतील महिला डॉक्टरने संपवलं जीवन; फादरकडे दिलेल्या चिठ्ठीमुळे पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:33 IST2025-01-10T12:28:22+5:302025-01-10T12:33:37+5:30

वसईत एका महिला डॉक्टरने पतीच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे.

Female doctor ends life in Vasai accused husband arrested | मिसेस इंडिया स्पर्धेतील महिला डॉक्टरने संपवलं जीवन; फादरकडे दिलेल्या चिठ्ठीमुळे पतीला अटक

मिसेस इंडिया स्पर्धेतील महिला डॉक्टरने संपवलं जीवन; फादरकडे दिलेल्या चिठ्ठीमुळे पतीला अटक

Vasai Crime: वसईत एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या डॉक्टर डेलिसा परेरा यांच्या आत्महत्येने वसईत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री वसई पोलिसांनी डेलिसा परेरा यांचे पती रॉयल परेरा यांना अटक केली. आत्महत्येपूर्वी डेलिसा परेरा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कारण लिहीलं होतं. आपल्या पतीचे अनैतिक संबंध होते आणि त्यावरून तो शारिरिक आणि मानसिक छळ करत होता असं परेरा यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे.

पती रॉयल परेरा याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी अटक केली आहे. डेलिसा परेरा वसईतील सोनारभाट इथं रॉयल परेरा आणि १२ वर्षांच्या मुलीसह राहत होत्या. वसईच्या प्रसिध्द कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात डेलिसा परेरा फिजिओथेरेपिस्ट म्हणून काम करत होत्या. डेलिस परेरा यांनी विवाहित महिलांसाठी असणाऱ्या मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला तेव्हा परेरा या नेहमीप्रमाणे कामावर आल्या होत्या.

सोमवारी संध्याकाळी डेलिसा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी परेरा या चर्चमध्ये गेल्या होत्या. त्यांनी चर्चच्या फादरना भेटून एक लिफाफा दिला. त्यातली चिठ्ठी फादरनी डेलिसा परेरा यांच्या आईला दिली. त्यानंतर डेलिसा परेरा यांच्या हत्येचे कारण समोर आलं. याप्रकरणी डेलिसा यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर वसई पोलिसांनी आरोपी रॉयल याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

काय लिहीलं होतं चिठ्ठीत?

पती रॉयल परेराचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तसेच रॉयल हा डेलिसा परेरा यांना शारिरिक आणि मानसिक त्रास देत होता. २६ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत रॉयलने शारिरीक आणि मानसिक त्रास दिला होता असं डेलिसा यांनी आत्महत्या करण्यापूर्वीच्या चिठ्ठीत म्हटले होते. 
 

Web Title: Female doctor ends life in Vasai accused husband arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.