शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

बोगस भरती रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:28 PM

जि.प.चे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अटकेत : आणखी मोठे मासे गळाला लागणार?

हितेन नाईक

पालघर : बोगस शासन निर्णयाच्या आधारे ८० शिपायांची भरती करणाऱ्या अधिकारी आणि दलालांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणात पालघर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा रायगडचे जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी व त्यांच्या सहकाºयाला पालघरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करीत सोमवारी पालघर न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचे अवर सचिव भरत पाटील यांनी आपल्या सहीनिशी बनविलेल्या बोगस शासन निर्णयाचा आधार घेत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ८० शिपायांना (परिचर) पालघर जिल्हा परिषदेत सामावून घेत बोगस नोकºया दिल्या होत्या. केंद्र शासनामार्फत २००९-१० या वर्षांपासून राज्यात अपंग एकात्मिक शिक्षण योजना माध्यमिक स्तर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अपंग समावेशित शिक्षण योजना ही योजना नव्याने राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यामुळे अगोदरची अपंग एकात्मिक शिक्षण योजना १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आली. यानुसार बंद झालेल्या योजनेमुळे या योजनेतील कार्यरत विशेष शिक्षक व परिचर यांचे १५ सप्टेंबर २०१० च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांमध्ये समायोजन करण्याचा आधार घेऊन पालघरच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकरी निधी चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक (पुणे) यांना पत्र लिहून त्याद्वारे पालघरमध्ये रिक्त असलेली २११ पदे भरण्यासाठी प्रतीक्षा यादीवरील शिपाई कर्मचाऱ्यांना पालघर जिल्ह्यात सामावून घेण्याची तयारी दर्शविली होती. या समायोजनेला पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी आक्षेप नोंदवीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवीत चौकशीची मागणी केली होती.परिचर नियुक्ती : एकूण ८८ आरोपीच्या प्रकरणातील आरोपी सखाराम मोते यांच्या घराच्या झडतीत मंत्रालयातील अवर सचिव, ग्रामविकास विभागाच्या भरत पाटील यांच्या सहीनिशी २७ नोव्हेंबर २०१७ अन्वये बोगस शासन निर्णय मिळून आला होता. हे खोटे अनधिकृत व बनावट पत्राचा आधार घेऊन जिल्हा परिषदमध्ये ८० परिचरांच्या नियुक्त्यांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता.च्तत्कालीन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, वरिष्ठ सहाय्यक रमेश पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद कहू यांनी काही वरिष्ठ अधिकाºयांच्या आशीर्वादानेच या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, असा आरोप आहे. या परिचर नियुक्ती घोटाळ्यात८० परिचरपदी नियुक्त कर्मचाºयासह अन्य ८ असे एकूण ८८ आरोपी आहेत.भरत पाटील यांच्याभोवतीचा फास आवळला? : प्रकाश देवऋषी यांना १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमधून अटक केली होती. त्यामुळे या अवर सचिव भरत पाटील यांच्याभोवतालचा फास आवळला गेला असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश असून परिचर आणि अनुकंपा भरतीतील सर्व दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार