शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

आदिवासींना रोजगाराची चिंता; प्रशासनाची उदासीनता मजुरांना भोवते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 11:45 PM

मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्त्वावर रोजगार हमी योजना कार्यरत आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा : तालुक्यातील नाशेरा, आसे बोटोशी, खोच, सायदे, धामणशेत, अशा सहा ग्रामपंचायतीतील आठशेपेक्षा अधिक जॉबकार्डधारक मजुरांनी मागणी पत्रक नमुना क्रमांक ४ भरून मोखाडा पंचायत समितीकडे महिनाभरापूर्वी कामाची मागणी केली आहे. मात्र, त्यांना अद्याप काम मिळालेले नाही.मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्त्वावर रोजगार हमी योजना कार्यरत आहे. जॉबकार्ड मजुरांनी मागणी पत्रकातील नमुना क्र. ४ भरून दिल्यानंतर १५ दिवसात काम देणे बंधनकारक आहे. काम दिले नाही तर बेकारभत्ता देणे बंधनकारक आहे. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला नाही. यामुळे काम देत नसाल तर बेकारभत्ता तरी द्या, अशी संतप्त प्रतिक्रि या महेश झुगरे या मजुरांनी दिली.रोहयो मजुरांच्या मागणीनुसार वर्षभरात रोहयो मजुरांना १०५ दिवस काम देणे शासनास बंधनकारक आहे. ‘मागेल त्याला पंधरा दिवसात रोजगार’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाचा उद्देश यशस्वी होताना दिसत नाही. यामुळे येथील आदिवासी रोहयो मजुरांना स्थलांतरित व्हावे लागते. कायमस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने, या आदिवासी ग्रामीण भागात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य, गरिबी अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.वास्तविक, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रोजगार देणाऱ्या जॉबकार्ड धारक रोहयो मजुरांना ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाणलोट क्षेत्र, वनीकरण, अशा यंत्रणा आहेत.आम्ही शेकडो मजुरांनी मागणी पत्रक क्र मांक ४ पंचायत समितीकडे महिनाभरापूर्वी भरून दिला आहे परंतु आम्हाला अद्याप काम दिले नाही- देविदास झुगरे, सायदेग्रामपंचायत वंचित मजूरआम्हाला माहिती देता येणार नाही. बीडीओंना विचारल्याशिवाय आम्हाला माहिती देण्याची परवानगी नाही.- नामदेव पाटील, सहा. कार्यक्र म अधिकारी, रोहयो विभाग, मोखाडातालुक्यातील एक हजार पेक्षा अधिक मजुरांचे नमुना नं ४ आम्ही पंचायत समितीकडे भरून दिले आहेत यामधील काही मोजक्या मजुरांना रोजगार मिळाला आहे. सायदे ग्रामपंचायतीतील एकाही मजुराला रोजगार मिळालेला नाही. यामुळे रोहयो योजनेचा उद्देश बासनात गुंडाळला जातोय.- पांडू मालक, सचिव - श्रमजीवी संघटना मोखाडा तालुकायाबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. कामे सुरू करा दिवाळीला सर्व मजुरांना कामाचा मोबदला मिळायला हवा.- प्रदीप वाघ, सभापती पंचायत समिती, मोखाडाकाही मजुरांना काम उपलब्ध झाले. ज्या मजुरांना काम उपलब्ध झालेले नाही त्यांनाही काम दिले जाईल.- संगीता भांगरे, बीडीओ पंचायत समिती मोखाडा

टॅग्स :jobनोकरी