शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

प्रामाणिक रिक्षाचालक व वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला परत मिळाला महागडा लॅपटॉप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 7:09 PM

Vasai News : वसईतील रिक्षाचालक रविंद्र मोहिते व वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ओमनगर भागात राहणारे राजेश केशवानी यांना मोहिते यांच्या रिक्षेत विसरलेला महागडा लॅपटॉप परत करण्यात यश आले आहे.

आशिष राणे

वसई - मागील वर्षी जगभरात हाहाकार माजवलेला कोरोनाचे संकट व संक्रमण दुसऱ्या वर्षी ही कायम आहे. तर आर्थिक विवंचनेत ही केवळ मेहनतीची भाकरी खाणारे आजही आपल्या समाजात सन्मानाने जीवन जगत आहेत. मग तो सामान्य माणूस असो की कर्तव्यावरील पोलीस दादा असो मात्र हाच प्रामाणिकपणा तुम्हाला आत्मिक समाधान देतो हे सुद्धा तितकच सत्य आहे. अशीच एक घटना वसईतील ओमनगर भागात 27 एप्रिल रोजी दुपारी घडल्याचे वसई वाहतूक शाखेचे सहा.उप.पोलीस निरीक्षक तानाजी चौगुले यांनी लोकमतला सांगितले आहे.

वसईतील रिक्षाचालक रविंद्र मोहिते व वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ओमनगर भागात राहणारे राजेश केशवानी यांना मोहिते यांच्या रिक्षेत विसरलेला महागडा लॅपटॉप परत करण्यात यश आले आहे. वसई रोड स्टेशन परिसरात रिक्षाचालक रविंद्र मोहिते हे रिक्षा चालवून प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करत आहेत. 27 एप्रिल रोजी दुपारी वसई अंबाडी रोड रिक्षा स्टँड येथून राजेश केशवांनी मोहिते यांच्या MH 48 AX 5916 या रिक्षामध्ये बसले व  पाठीमागे आपला लॅपटॉप ठेवून दिला.

रिक्षामध्ये एक दुसरा प्रवाशी ही होता तर यातील दोघेही प्रवाशी हे ओमनगरमध्ये उतरवून मोहिते पुन्हा स्टेशनवर आले असता मोहितेंना रिक्षामध्ये पाठीमागे एका बॅगेत लॅपटॉप दिसला. खरं तर रिक्षामध्ये कोणाचा लॅपटॉप राहिला किंवा त्याचे नाव पत्ता काहीच माहिती नसल्याने मोहिते यांनी वसई वाहतूक शाखेत धाव घेतली. तेथील वाहतूक विभागाचे सउपोनि तानाजी चौगुले व  सउपोनि रविंद्र परब यांना समक्ष भेटून लॅपटॉप जमा केला.

दरम्यान रिक्षाचालक मोहिते यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे तात्काळ दोन वाहतूक पोलिसांनी मोहिते यांनी ज्या दोघा प्रवाशांना ओमनगर भागात उतरवले होते तिथे चौकशी केली व काही तासांनी आपलं कौशल्य सिद्ध करीत त्या लॅपटॉप मालकाचे घर गाठलं. संध्याकाळी राजेश केशवानी यांना वाहतूक शाखेत बोलवून पोलिसांनी रिक्षा चालक मोहिते व  केशवानी यांची ओळख पटवली आणि शेवटी तो महागडा लॅपटॉप त्या राजेश केशवानी यांच्या स्वाधीन केला. यावेळी केशवानी यांनी मोहिते व वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

रिक्षाचालक मोहिते यांच्या प्रामाणिकपणाचे वाहतूक पोलिसांकडून कौतुक करीत त्यांना सन्मानित करण्यात आले. आजही समाजात रिक्षाचालक रविंद्र मोहिते सारखे प्रामाणिक व सतर्कता दाखवणारे पोलीस दादा ही फार कमी आहेत हे जरी सत्य असले तरी पण मोहिते यांनी कोरोना महामारीच्या व लॉकडाऊनमध्ये पण आपला प्रामाणिकपणा व माणुसकी दाखवली याबाबत वसईकर मोहिते सहित त्या दोन वाहतुक पोलिसांचे ही कौतुक करत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारlaptopलॅपटॉपPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा