शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 23:58 IST

कोरोना रुग्णवाढीची नागरिकांमध्ये पसरली भीती : वाहनांचीही वर्दळ घटली

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : कोरोनामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लावून शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे वसई-विरारमध्ये शनिवारनंतर रविवारीही नागरिकांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वतःहून घरीच थांबल्याने कडक लॉकडाऊन यशस्वी झाला आहे. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नसल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.पोलिसांनी नालासोपाऱ्याच्या संतोष भवन, प्रगती नगर, एव्हरशाईन, गाला नगर, अलकापुरी, नागीनदास पाडा, तुळींज ओव्हर ब्रिजच्या खाली, सिविक सेंटर, हेगडेवार चौक, धनंजय स्टॉप या ठिकाणी चोख बंदोबस्त लावून नाकाबंदी करत रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करत होते.तुरळक रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहन, दुचाकी यांची पोलीस तपासणी करत होते. वाहनांची कागदपत्रे, वाहन परवाना, रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचे आयडी कार्ड तपासणी केली जात होती. एरव्ही नालासोपारा पूर्वेकडील परिसरातील रस्त्यावर पाय ठेवण्यासाठी नागरिकांना जागा मिळत नसलेल्या रस्त्यावर रविवारी शुकशुकाट पसरला होता. दोन्ही झोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, प्रशांत वाघुंदे यांनी सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पेट्रोलिंग करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. विनाकारण फिरणाऱ्यांना घरात बसण्याची पोलिसांनी विनंती केली. दरम्यान, वसई, अर्नाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनाऱ्यांवर बंदमुळे संपूर्ण शुकशुकाट पसरला असल्याचे पाहायला मिळाले. 

वाहतूक पोलिसांची कारवाईशनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर केसेस करून दंड वसूल करण्यात आला आहे. शनिवारी विरार आणि वसई या दोन झोनमधील वाहतूक पोलिसांनी विदाऊट सीट बेल्ट, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, विनालायसन्स, रिक्षांवर कारवाई, नो पार्किंग अशा केसेस केल्या आहेत. वसई वाहतूक विभागाने ३३१, तर विरार वाहतूक विभागाने २२५ केसेस केल्या आहेत.