डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 24, 2014 22:47 IST2014-05-24T19:59:47+5:302014-05-24T22:47:41+5:30

कुटूंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल महिलेवर चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Death of a woman due to doctor's mistake | डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू

डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू

नायगाव : कुटूंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल महिलेवर चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
जयश्री डाबरे (२८, रा. भुईगांव) असे मृत विवाहीत महिलेचे नाव असून शुक्रवारी संध्याकाळी विरार पुर्वेस जिवदानी रोडवरील गणेश हॉस्पीटलमध्ये ती दाखल झाली होती. दरम्यान, चुकीची नस कापल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत महिलेचे पती राजेश डाबरे यांनी केल्याने याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी भुईगाव चर्च येथे मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. या महिलेच्या प›ात ७ वर्षीय मुलगा व ३ वर्षीय मुलगी आहे. घटनेचा अधिक तपास स. पो. नि. पाटील करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Death of a woman due to doctor's mistake