प्रारूप मतदार यादी वर हरकतीची मुदत वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 02:09 IST2025-11-27T02:09:25+5:302025-11-27T02:09:40+5:30
त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम देखील पुढे गेला आहे..

प्रारूप मतदार यादी वर हरकतीची मुदत वाढवली
मीरारोड - प्रारूप मतदार यादीतील सावळा गोंधळ पाहता आता राज्य निवडणूक आयोगाने हरकत सूचना देण्याची मुदत २७ नोव्हेंबर ऐवजी वाढवून ३ डिसेंबर केली आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम देखील पुढे गेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचे, सदोष व अपूर्ण माहिती आदी प्रकार मीरा भाईंदर मध्ये उघडकीस आले आहे. त्याच सदोष विधानसभा मतदार संघ यादीचा वापर करून महापालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी तयार करून जाहीर केली आहे. त्यावर हरकती सूचना ची मुदत २७ नोव्हेंबर पर्यंत होती.
मात्र मतदार यादीत मोठा सावळा गोंधळ असल्याचे उघडकीस आल्याने टीकेची झोड उठत आहे. आयोग पर्यंत तक्रारी केल्या गेल्या. निवडणूक आयोग, महापालिका व सत्ताधारी पक्ष वर आरोप विरोधी पक्षांनी केले.