गायब रिक्षाचालकाचा मृतदेहच सापडला

By Admin | Updated: September 23, 2015 03:53 IST2015-09-23T03:53:24+5:302015-09-23T03:53:24+5:30

रविवारपासुन बेपत्ता असलेल्या राजेश नंददेव चौधरी (३६) रा. भाटपाडा या रिक्षाचालकाचा मृतदेह विरार जवळच्या कुंभारपाडा येथील जंगलात सापडला

The dead body of the rickshaw driver was found | गायब रिक्षाचालकाचा मृतदेहच सापडला

गायब रिक्षाचालकाचा मृतदेहच सापडला

पारोळ : रविवारपासुन बेपत्ता असलेल्या राजेश नंददेव चौधरी (३६) रा. भाटपाडा या रिक्षाचालकाचा मृतदेह विरार जवळच्या कुंभारपाडा येथील जंगलात सापडला. त्यांच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याने त्यांचा खून झाला असावा असा संशय विरार पोलीसांनी व्यक्त केला. याप्रकरणी राजेशची बायको आणि मित्राला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
राजेशची रिक्षा विरार ते मनवेलपाडा या भागात प्रवाशांची ने-आण करीत असे. रविवारी राजेश रिक्षा घेऊन गेला तो परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे सोमवारी तो हरवल्याची तक्रार विरार पोलीसांत केली.
मंगळवारी राजेशचा मृतदेहच मंगळवारी सकाळी सापडला. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी करून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांचा मृतदेह विरार येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. राजेश यांची रिक्षा घाणीचा तलाव येथे रस्त्याच्या कडेला आढळली. तर त्यांचा मृतदेह दोन कि. मी. पुढे जंगलात सापडला. त्यामुळे या हत्येबाबत गुढ निर्माण झाले असून अधिक तपास सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: The dead body of the rickshaw driver was found