दिराने केली वहिनीची हत्या, घरात घुसून चाकूने केलं सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 20:40 IST2017-10-16T20:39:45+5:302017-10-16T20:40:14+5:30

दिराने आपल्या वहिनीची तिच्या घरात घुसून चाकूने सपासप वार करून दिवसाढवळ्या हत्या केली. हत्या केल्यानंतर दीर फरार झाला.

Darnay karni ki dhini ki kills, entered the house and knife was done with saupap war | दिराने केली वहिनीची हत्या, घरात घुसून चाकूने केलं सपासप वार

दिराने केली वहिनीची हत्या, घरात घुसून चाकूने केलं सपासप वार

वसई - नालासोपाऱ्यात दिराने आपल्या वहिनीची तिच्या घरात घुसून चाकूने सपासप वार करून दिवसाढवळ्या हत्या केली. हत्या केल्यानंतर दीर फरार झाला. सासरच्या लोकांनीच ही हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. निखत शेख असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास निखत रहात असलेल्या नसीम अपार्टमेंटमधील घरात घुसून दीर सलमान शेखने तिच्या पोटावर, गळ्यावर, हातावर चाकूने सपासप वार केले. इतकेच नाही तर जखमी निखतला ओढत गॅलरीत आणून टाकले. यावेळी तिला वाचवण्यासाठी आलेल्या शेजारील महिलेवरही सलमानने हल्ला केला. त्यात ती महिला जखमी झाली. यावेळी आरडाओरडा झाल्याने सलमान पसार झाला.

निखतचा विवाह नदीम शेखसोबत तीन वर्षांपूर्वी झाला होता. तिला एक मुलगी असून ती गरोदर होती. निखतचा तिचा पती, सासू, दीर, छळ करीत असत. तिच्या हत्येला ही मंडळी जबाबदार आहेत. निखतची हत्या  पूर्वनियोजित कट होता. ती दोन महिन्याची गरोदर होती, असा आरोप तिचा भाऊ मौसीन शेख यांनी केला आहे.

कौटुंबिक वादातून निखतची हत्या झाली असावी असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र माहेरच्या लोकांनी केलेल्या आरोपाचा तपास केला जात असून चौकशीनंतर हत्येचे कारण स्पष्ट होईल, असे डीवायएसपी दत्ता तोटेवाड यांनी सांगितले.

Web Title: Darnay karni ki dhini ki kills, entered the house and knife was done with saupap war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.