डहाणूच्या समुद्रात जेलिफिशची दहशत, अंगाची जळजळ : त्वचेवर उठले फोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:42 AM2017-10-14T02:42:03+5:302017-10-14T02:42:36+5:30

तालुक्यातील समुद्रात लाटांशी खेळताना विद्यार्थी जेलिफिशच्या संपर्कात येऊन त्यांच्या शरीराची जळजळ सुरु झाली असून अनेकांना पुरळ उठल असल्याने पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

 Dahanu's sea-related jellyfish panic, limb burning: skin bursts on the skin | डहाणूच्या समुद्रात जेलिफिशची दहशत, अंगाची जळजळ : त्वचेवर उठले फोड

डहाणूच्या समुद्रात जेलिफिशची दहशत, अंगाची जळजळ : त्वचेवर उठले फोड

Next

बोर्डी : तालुक्यातील समुद्रात लाटांशी खेळताना विद्यार्थी जेलिफिशच्या संपर्कात येऊन त्यांच्या शरीराची जळजळ सुरु झाली असून अनेकांना पुरळ उठल असल्याने पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
पारनाका समुद्र किनारी गुरु वारी सकाळच्या सुमारास काही विद्यार्थी लाटांशी खेळत होते. या वेळी जेलीफिशचा थवा किनाºयापर्यंत आला होता. अनिभज्ञ विद्यार्थ्यांना या माशांचा स्पर्शाने कोणतीही इजा झाली नाही. मात्र, काही वेळाने त्यांच्या सर्वांगाचा दाह झाला. काहीनां पुरळ उठले तसेच त्वचा लालसर झाली. काही वेळाने हा दाह थांबला असला तरी खेळण्याची हौस त्यांना चांगलीच महागात पडली.
या प्रकाराने विद्यार्थी चांगलेच घाबरले असून पर्यटकां मध्येही भीतीचे वातावरण आहे. या माशामुळे शरीराला मोठी इजा पोहचत नाही, परंतु काही काळ जळजळ होते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त किनारी पर्यटनाला प्रारंभ होत असून जेलिफिशपासून वाचण्यासाठी पर्यटकांना पोहण्याच्या इच्छेला आवर घालावे लागणार आहे. या बाबत पर्यटकांना धोक्यापासून सावध करण्यासाठी जीवरक्षक तैनात करण्यासह माहितीफलक लावण्याचे काम प्रशासन करणार आहे.

Web Title:  Dahanu's sea-related jellyfish panic, limb burning: skin bursts on the skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.