शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
6
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
7
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
8
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
9
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
10
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
11
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
12
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
13
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
14
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
15
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
16
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
17
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
18
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
19
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
20
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी

डहाणू-विरार ५ वर्षांत ६१३ बळी, ट्रॅक ओलांडणे, दारातून पडणे बेतते जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 6:40 AM

डहाणू-विरार दरम्यान रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या ५ वर्षात वेगवेगळ्या अपघातात ६१३ जणांचा बळी गेला आहे.

- हितेन नाईकपालघर : डहाणू-विरार दरम्यान रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या ५ वर्षात वेगवेगळ्या अपघातात ६१३ जणांचा बळी गेला आहे.वसई-विरारची लोकसंख्या वाढल्यामुळे इथला वर्ग पालघर, डहाणूकडे स्थलांतरीत होत आहे. पश्चिम रेल्वेने डहाणूपर्यंतच्या सेवेला उपनगरीय दर्जा दिला असला तरी गाड्यांच्या संख्येत पुरेशी वाढ न झाल्याने इथल्या प्रवाशांना आता ट्रेन च्या दरवाज्यात लटकून प्रवास करावा लागतो आहे. डहाणू-विरार दरम्यानच्या वाढत्या गर्दीमुळे हे अपघाती मृत्यू झाले असून हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही.गेली अनेक वर्षे येथील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना व येथील प्रशासन प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ घडवून आणण्याबाबत सतत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. इथल्या प्रवाशांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथे यानिमित्ताने होत आहे.मुंबईतील महागडी घरे परवडत नसल्याने सर्वसामान्यांनी वसई-विरारला पसंती देऊन स्वस्त घरासाठी तो पर्याय निवडला. मात्र येथेही घरांचे भाव वाढत चालल्याने तसेच गर्दी प्रचंड वाढल्याने नागरिकांनी स्वस्त घरासाठी पालघर, बोईसर, डहाणूची निवड केली.येथील वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे रेल्वेमधील गर्दी पूर्वीपेक्षा दुपटीने वाढू लागली. हा नागरीकरणाचा विस्तार येथील रेल्वे सेवांच्या मानाने मोठा असल्याने येथील अपघातात होणारे हे मृत्यू या मागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील बहुसंख्य बळी हे प्रवास करतांना खाली पडणे, लोहमार्ग ओलांडत असतांना धडक बसणे, दरवाजाला लोंबकळून प्रवास करतांना पोलचा फटका बसून खाली पडणे. अशी आहेत.ती दूर करण्यासाठी रेकची संख्या वाढविणे, त्यांच्या डब्यांची संख्या वाढविणे व पादचारी पुलांची संख्या आणि रुंदी वाढविणे सरकते जीने बसविणे आदी उपाय करण्याची आवश्यकता आहे.रेल्वेला पर्याय नसल्याने जीवावर उदारयेथील परिसरातील प्रवासी जात असताना रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी व रेटारेटी होते. प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. कारण त्यांना दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो.या मार्गावर वाढत असलेले प्रवासी व येथे या पाच वर्षात बळी गेल्याची आकडेवारी पाहता रेल्वे प्रशासनाने येथील लोकलची संख्या तसेच डबे वाढवावेत, तसेच लांब अंतराचा प्रवास करणाºयांना मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. येथील लोकल सेवा मुंबई प्रमाणे करून या मार्गावर दर ३० मिनिटाला एक लोकल सोडण्याची मागणीही रेल्वेकडे केली आहे.डहाणू ते विरार दरम्यान अपघातांची संख्या वाढत चालली असल्याचेही जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१७ दरम्यान ६१३ प्रवाशांचा बळी गेल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वसई विरारचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार चोरघे यांनी याबाबतीत मागितलेल्या माहितीद्वारे ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.1084पुरु षांचा बळी224महिलांचा बळी1,308जणांचा विविध कारणांनी मागीलदहा वर्षात सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान बळी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार