डहाणू : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून दोन दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली असून महिलांना तसेच ज्येष्ठांना वारंवार लक्ष करण्यात येत आहे. डहाणूच्या इराजी रोडे, सागरनाका, स्टेट बँक रोड, मसोल, के.टी नगर येथील बाजारपेठ, किराणादुकान तसेच बँकेत जाणाऱ्या महिलांच्या गळ््यातील सोन्याचे दागिने दिवसा ढवळ््या हिसकावून पळून जाणाऱ्या दोन मोटारसायकलस्वार चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.१६ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० सुमारास आशा जैसवाल परिसरातील एका लग्न समारंभातून परतत असताना त्यांच्या गळ््यातील मंगळसूत्र हिसकावले, त्यानंतर मसोली येथे मंगळसूत्र हिसकावून दोन चोरट्यांनी पलायन केले. सात आठ दिवसांनंतर के.टी. नगर येथे रिक्षातून उतरलेल्या एका महिलेला पोलीस असल्याची थाप मारून हातचालाखीने मंगळसूत्र घेऊन पोबारा होण्याचा प्रकार घडला. असे एकूण सहा सात घटनांची नोंद होऊन सुद्धा पोलीसांना त्यांना पकडण्यात यश येत नाही. दागिने पिशवित ठेवा असे भामट्यांनी सांगितल्याने मस्त्री यांनी चैन काढून ठेवली परंतु घरी आल्यानंतरती नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी डहाणू पोलिसांत धाव घेतली. (वार्ताहर)
डहाणूमध्ये धूम स्टाइल चोर, भामट्यांची दहशत
By admin | Updated: March 5, 2017 02:34 IST