शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका, ४० कोटींची बचत थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:21 IST

कोरोना व्हायरस भारतात व वसईत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मध्यंतरी काही काळ मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सरकार आता पुन्हा लॉकडाऊनबाबतीत पुनर्विचार करीत आहे.

- आशिष राणे  वसई : कोरोना व्हायरस भारतात व वसईत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मध्यंतरी काही काळ मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सरकार आता पुन्हा लॉकडाऊनबाबतीत पुनर्विचार करीत आहे.खरेतर, जसा कोरोनामुळे संपूर्ण जगभर नोकरी, उद्योगधंदे, घरची परिस्थिती आदींवर याचा विपरीत परिणाम झाला, तसा याचा आर्थिक फटका राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थांचा तालुका म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या वसईतील सहकारी पतसंस्था व त्यामधील पिग्मी एजंट अथवा वसुली अधिकारीवर्गावरही होत आहे.सुरुवातीपासूनच एक ऐतिहासिक व्यापारी शहर म्हणून वसईची ओळख आहे. वसई तालुक्यात शहर व ग्रामीण भाग येतो. मोठ्या प्रमाणावर असलेला व्यापारीवर्ग, किराणा व इतर माल भाजीपाला  खरेदीसाठी नागरिक, छोटे-मोठे व्यापारी इथे येत असतात. त्यामुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. म्हणूनच, या ठिकाणी शहरात तीन सहकारी बँका, आठ ते दहा मल्टीस्टेट छोट्या सोसायट्या, पतसंस्था व इतर फायनान्स व इतर छोटी-मोठी फायनान्स अशा १०० हून अधिक सहकारी संस्था आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून कर्जदार व बिगर कर्जदार खातेदारांकडून दररोज सुमारे ३०० एजंटांच्या माध्यमातून हे पिग्मी कलेक्शन केले जाते. छोटे दुकानदार हे आपल्या रोजच्या व्यवसायातून बचत म्हणूनदेखील रोज १० रुपयांपासून ते १०० ते ५०० रुपयांपर्यंत कलेक्शन भरत होते, तर काही व्यावसायिकांनी खेळते भांडवल म्हणून यावर कर्जही घेतले आहे. ते या पिग्मीच्या माध्यमातून संस्था, बँकांकडे भरत असतात. मात्र, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रावरदेखील मोठे संकट ओढवले आहे.  सामान्यजनांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर हे संकट दूर व्हावे, यासाठी संपूर्ण जगभरात प्रार्थना होऊ लागल्या आहेत. यामुळे देशाचीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे. सोबत, सहकाराचा तालुका असलेल्या वसई तालुक्यात या क्षेत्रालाही सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. ३०० हून अधिक लाेकांना राेजगारnसहकारी बँका व पतसंस्था आदी संस्थांबरोबरच या संस्थेत पिग्मी एजंट म्हणून दैनंदिन ठेव गोळा करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात तालुक्यातील सहकारी बँका व पतसंस्था यांची आकडेवारी पाहिली, तर ८० पतसंस्था व ३ सहकारी बँका आहेत. यात अवलंबून ३०० हून अधिक पिग्मी एजंट व वसुली अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ही उलाढाल पाहिली तर हा आकडा ४० ते ५० कोटींवर जातो. पिग्मी एजंटना कमिशनरूपातून उत्पन्न मिळते.nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मागील मार्च २०१९ पासून लाॅकडाउन लागू करण्याचा निर्णय तर घेतला, मात्र पुन्हा आता आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात  असून कोरोनाच्या पुन: पुन्हा सावटामुळे रोजगारनिर्मिती व व्यवसाय  व्यवस्थापन आणि आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. याचा सर्वाधिक फटका बँकेच्या व सहकारी पतसंस्थांमधील कलेक्शनवर पडला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार