वसईतील प्रेमीयुगुलाची वाड्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 00:41 IST2019-11-29T00:41:05+5:302019-11-29T00:41:29+5:30
वसई तालुक्यातील माजिवली येथील योजना पारधी आणि करंजोन वरंजाड पाडा येथील नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी दुपारी वाडा तालुक्यातील केळठण गावाच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

वसईतील प्रेमीयुगुलाची वाड्यात आत्महत्या
वाडा - वसई तालुक्यातील माजिवली येथील योजना पारधी आणि करंजोन वरंजाड पाडा येथील नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी दुपारी वाडा तालुक्यातील केळठण गावाच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यातील योजना ही अल्पवयीन आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, माजिवली गावातील योजना पारधी (१७) ही मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी सातिवली येथील एका कंपनीत कामासाठी गेली होती. त्यानंतर तिने घरी फोन करून आपण आता कधीच घरी परत येणार नसल्याचे बहिणीला सांगितले. तिची शोधाशोध केली असता ती वाड्यातील केळठण गावच्या हद्दीत बेशुद्धावस्थेत सापडली.
यावेळी तिच्या सोबत नितीन भुजड (२२) हा तरूणही बेशुद्ध अवस्थेत सापडला. दोघांना तत्काळ वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. लग्नास विरोध केल्याने या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा संशय असून अधिक तपास प्रमोद दोरकर करीत आहेत.