शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

CoronaVirus News : रुग्णवाढीमुळे यंत्रणेवर वाढला ताण!, नऊ हजार ३९४ रुग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:26 PM

CoronaVirus News : जिल्ह्यातील धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण सतत वाढत गेल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.

बोईसर : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासह अन्य तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांची संख्या व उपलब्ध सोयी-सुविधांकडे गांभीर्याने पाहिले असता जिल्ह्यात सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात बाधितांचा आकडा ६१ हजारहून जास्त झाला असून सध्या ९ हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण सतत वाढत गेल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. कोरोना रुग्णांना, त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला जिल्ह्यात असलेल्या रुग्णालयांत बेड मिळविण्यासाठी अक्षरशः प्रचंड पायपीट करावी लागत आहे. बेड उपलब्ध होत नसल्याने बरेच लोक हतबल होत आहेत. अथक प्रयत्नांनंतर कसाबसा बेड मिळालाच तर तेथे ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केल्या जात आहेत.आज अत्यवस्थ रुग्णांना शहरी किंवा शेजारच्या गुजरात राज्याचा आधार घ्यावा लागतो; परंतु तेथील रुग्णालयांतही बेड उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. दुर्दैवाने काही तर या प्रवासातच शेवटचा श्वास घेत आहेत. त्यामुळे अपूर्ण पडणारी आरोग्य व्यवस्थाच सध्या ऑक्सिजनवर असून, एकूणच परिस्थिती कठीण व भयावह होत आहे.कोरोनाचे जिल्ह्यात आगमन झाल्यापासून शासकीय आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, कर्मचारी, पोलीस, महसूल व ग्रामपंचायत यंत्रणा, आशावर्कर, सफाई कामगार तर काही खासगी रुग्णालयातील यंत्रणेने अहोरात्र धोका पत्करून काम केलेले आहे. त्यामुळे बहुसंख्य रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत. एकूणच आरोग्य यंत्रणेची स्थिती गंभीर होत असून, ती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कोरोनासंबंधित नियम काटेकोरपणे पाळणे सर्वांचे कर्तव्य आहे.

आणखी कोविड सेंटर होताहेत तयारजिल्ह्यात अधिकारी लाइफलाइन बेटेगाव बोईसर येथे ६० खाटांचे, फिलिया हॉस्पिटल ५० खाटा, वरद हॉस्पिटल, बोईसर ५० खाटा, रिलीफ हॉस्पिटल पालघर ४० खाटा, तर शारदा हॉस्पिटल विक्रमगड येथे ४० खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र तरीही वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता बेडचा तुटवडा जाणवणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार