CoronaVirus: अखेर वसईत कोरोनाची शंभरी पार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:35 PM2020-04-23T23:35:41+5:302020-04-23T23:36:25+5:30

वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 101

CoronaVirus covid 19 patient toll crosses 100 in vasai virar | CoronaVirus: अखेर वसईत कोरोनाची शंभरी पार!

CoronaVirus: अखेर वसईत कोरोनाची शंभरी पार!

Next

- आशिष राणे

वसई -विरार शहरात गुरुवारी अखेर कोरोना विषाणूने आपली शंभरी पार केली असून गुरुवारी शहरात 5 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यात 2 महिला रुग्ण व 3 तरुणांचा समावेश आहे.

विषेश म्हणजे पुन्हा गुरुवारी वसई पश्चिमेस राहणारी व मुंबईत नर्स म्हणून कार्यरत असणारी 49 वर्षीय महिला रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आली आहे,
तर अन्य एक 44 वर्षीय महिला विरार पूर्वेस आढळून आली असून तिच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.

वसई गावात 31 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो मुंबई मनपा हद्दीतील रुग्णालयात उपचार घेत आहे,अन्य 36 वर्षीय व 31 वर्षीय असे दोन तरुण रूग्ण हे नालासोपारा पूर्व पश्चिम भागातील असून हे दोघेही मुंबईत उपचार घेत आहेत.

दरम्यान गुरुवारी संध्याकाळ पर्यँत ही एकूण संख्या शंभरी पार करीत 101 वर पोहचली असून आजवर वसई विरार शहरात एकूण 25 जण कोरोना मुक्त झाले असून हि बाब दिलास देणारी ठरली आहे तर कोरोनाच्या आजाराने आजवर 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

परिणामी वसई विरारची वाटचाल गुरुवारी शंभरी पार झाली असल्याने पालिकेच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. मात्र गुरुवारी पालिकेने 7 जणांना कोरोना मुक्त केल्याची बाब देखील दिलासा देणारी आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही .

दि.23 एप्रिल 2020  गुरुवारची कोरोना- रुग्णांची आकडेवारी
वसई -1 महिला,1 पुरुष, नालासोपारा - 2 पुरुष
आणि विरार -1 महिला एकूण रुग्ण संख्या  - 5
वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -101
कोरोना मुक्त संख्या :- 25
कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 6
उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-70                    

Web Title: CoronaVirus covid 19 patient toll crosses 100 in vasai virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.