शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

coronavirus: पालघरमध्ये ४६,५८५ जणांच्या कोरोना चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:02 AM

वसई-विरारमध्ये साडेपाच हजारांहून जास्त कोरोनाबाधित आढळलेले असून पालघरच्या अन्य भागांतही आतापर्यंत दीड हजारांहून जास्त रुग्ण सापडले आहेत.

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये विशेषत: वसई-विरारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वसई-विरारमध्ये साडेपाच हजारांहून जास्त कोरोनाबाधित आढळलेले असून पालघरच्या अन्य भागांतही आतापर्यंत दीड हजारांहून जास्त रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापर्यंत तब्बल ४६ हजार ५८५ जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यात वसई-विरारमध्ये ३७ हजार २९६, तर जिल्ह्याच्या अन्य भागांत नऊ हजार २८९ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत.वसई-विरारमध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णवाढीचा वेग खूपच वाढलेला दिसून येत आहे. मंगळवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार विरार १५३१, नालासोपारा २४०६, तर वसई-नायगावमध्ये १७६४ रुग्ण आढळलेले आहेत. या जीवघेण्या आजारामध्ये वसई-विरारमधील १३० रु ग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात विरार २७, नालासोपारा ७५ तर वसई-नायगावमधील २८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पालघरच्या अन्य भागांतही या गंभीर आजारामध्ये १९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. पालघरच्या अन्य तालुक्यांमध्येही आता कोरोनाने बरेच हातपाय पसरले आहेत. वसई तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्ण असून हा आकडा पाच हजार ७०१ हून जास्त गेला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे.मात करणारे वाढलेरुग्णवाढीचे प्रमाण जास्त असतानाच आता या जीवघेण्या आजारावर मात करणाऱ्यांची संख्याही दिलासादायक ठरली आहे. आजवर संपूर्ण जिल्ह्यातून चार हजार ६९६ जणांनी या आजारावर मात केलेली आहे. वसई-विरारमधील ३७००, तर पालघरच्या अन्य भागांतील ९९६ जणांचा समावेश आहे.मृत्युदर आणखी कमी करणार : डॉ. कैलास शिंदेपालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. मृत्युदरही एक टक्का इतका आहे. हा मृत्युदर ‘मिशन-चेस द व्हायरस’द्वारे एक टक्क्याच्या खाली आणणे शक्य होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेद्वारे तीन हजार अ‍ॅण्टिजन किट मिळाले असून १० हजार किट जिल्हा प्रशासन विकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.संशयित रुग्णांची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याआधारे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील जास्तीतजास्त संशयित रु ग्णांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. डहाणू येथे सुरू असलेल्या लॅबमध्ये रोज ५०० चाचण्या करण्यासाठी आॅटो आरटीपीसीआर मशीनचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच वेदान्त महाविद्यालयात लॅब सुरू करण्यासाठी विनंती केली आहे. तसेच ग्रामीणरुग्णालय वाडा येथे ‘ट्रूनॅट’ मशीनच्या माध्यमातून दररोज ५० रुग्णांची तपासणी करण्याची सुविधा मिळणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाभरातील सर्व आशा वर्कर्सना प्लस आॅक्सिमीटर देण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.नागरिकांना अचानक ताप येणे, खोकला, सर्दी, श्वसनास त्रास होणे, ही लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये संपर्क साधा. जिल्ह्यात कोणताही रुग्ण दगावणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघरVasai Virarवसई विरार