मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनर पलटला, वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 09:04 IST2021-08-27T09:03:35+5:302021-08-27T09:04:20+5:30
या मार्गावरील वाहनचालकांना पुढील काही तास वाहतूक कोंडीला समोर जावे लागणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनर पलटला, वाहतूक विस्कळीत
वसई : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचोटी भागात मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एक मोठा कंटेनर पलटी झाल्याची घटना शुक्रवार (दि. 27) च्या पहाटे 3 च्या सुमारास घडली. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे यात कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनचालक जखमी झाला आहे की नाही, हे मात्र अद्याप कळू शकले नाही.
शुक्रवारी पहाटे घडलेल्या या अपघातामुळे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतूक मात्र विस्कळीत झाल्याचे वाहन चालकाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कंटेनर पलटी झाल्यानंतर अद्याप त्याठिकाणी कंटेनर बाजूला काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून झालेली नसल्याचे समजते.
दरम्यान, हा कंटेनर लवकरात लवकर बाजूला काढणे गरजेचे असून सकाळच्यावेळी याठिकाणी मोठी वाहतूक मुंबईच्या दिशेने होत असते. त्यामुळे कंटेनर बाजूला करेपर्यंत या मार्गावरील वाहनचालकाना पुढील काही तास वाहतूक कोंडीला समोर जावे लागणार आहे.