शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सारख्या रंगाने गोंधळ; दुसऱ्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले २६ तोळे सोन्याचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:50 IST

पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करत त्या महिलेच्या २६ तोळे दागिन्यांचा शोध लावून ते महिलेच्या ताब्यात दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : सारखाच रंग असल्याने आपली दुचाकी समजून एका महिलेने शेजारी पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीत २६ तोळे सोन्याचे दागिने ठेवल्याची घटना वसईत घडली. हे दागिने गहाळ झाल्याच्या भीतीने तिने वसई पोलिस ठाणे गाठले. अखेर वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करत त्या महिलेच्या २६ तोळे दागिन्यांचा शोध लावून ते महिलेच्या ताब्यात दिले आहेत.

वसईच्या गिरीज गावातील  लिनेट ऍशली अल्मेडा (४२) २ जानेवारीला संध्याकाळी होळी शाखा येथील बॅसिन कॅथलिक बँकेत गेल्या होत्या. त्यांनी बँकेच्या लॉकरमधून बांगड्या, चेन, हार, सोन्याची बिस्किटे, कर्णफुले असे २६ तोळे वजनाचे व ३५ लाख रुपये किमतीचे दागिने काढले. ते त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले.   

घरी पोहोचल्यावर डिक्की तपासली असता दागिने आढळले नाही. वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी  दागिन्यांचा शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आदेश दिले. दरम्यान, बाजूच्या दुचाकीची डिक्की उघडीच असावी आणि घाईघाईत महिलेने डिक्कीत सोने ठेवले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

दोन पथके, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

बॅसिन कॅथलिक बँकेच्या होळी शाखा येथे जाऊन तेथील तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मात्र, माहिती मिळत नव्हती. अखेर वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, अंमलदार यांच्या दोन टीम तयार करून घटनास्थळ तसेच शेजारील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदाराच्या मदतीने तांत्रिकदृष्ट्या तपास करून दागिने ठेवलेल्या दुचाकीची माहिती मिळवली. 

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दुचाकी चालक महिला सुनीता फ्रेडी गोन्साल्विस यांच्याकडे जाऊन चौकशी करून गहाळ झालेले दागिने पीडित महिलेस परत मिळवून दिले आहे. वसई पोलिसांचे लेनिट यांनी मानले आहे. ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि महेंद्र भामरे, पोहवा प्रशांत पाटील, सूर्यकांत मुंडे, दिनेश पाटील, प्रशांत आहेर, सौरभ दराडे, अक्षय नांदगावकर, अमोल बरडे यांनी पार पाडली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mistaken Bike, Woman Leaves Gold Jewelry in Wrong Vehicle

Web Summary : Vasai woman mistakenly placed 26 tolas of gold jewelry in another's scooter due to similar color. Police investigation recovered the valuables, worth ₹35 lakhs, returning them to the relieved owner. Prompt action by police solved mystery.
टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस